AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: त्यांना थेट जेलमध्ये बंद करा..; सलमान खान संतापला, सरकारकडे केली कठोर कारवाईची मागणी

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्यांविरोधात आणि ते पसरवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई झाली पाहिजे, असं त्याने म्हटलंय.

Salman Khan: त्यांना थेट जेलमध्ये बंद करा..; सलमान खान संतापला, सरकारकडे केली कठोर कारवाईची मागणी
सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 9:51 AM
Share

Salman Khan: ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सोशल मीडियावर वाढत असलेल्या एआय डीपफेक व्हिडीओच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली. 27 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सोशल मीडियावरील चुकीच्या कंटेंटचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी सलमानने स्वतःचेही AI व्हिडीओ तयार केले जात असल्याचं सांगत, अशा प्रकारे जाणीवपूर्वक बनावट कंटेंट तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सलमान खानने सांगितलं की, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्याचा आवाज कॉपी करून त्यातून वेगळे संवाद तयार केले जात आहेत. काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचा वापर करून आक्षेपार्ह वक्तव्ये किंवा शिवीगाळही केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींचे बनावट व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पसरवले जात असल्याचं त्याने नमूद केलं.

काही सोशल मीडिया युजर्सना एखादा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे, हे माहिती नसतं. त्यामुळे ते तो खरा समजून पुढे शेअर करू शकतात. मात्र, व्हिडीओ बनावट असल्याची जाणीव असूनही तो तयार करणाऱ्या आणि पसरवणाऱ्या लोकांबाबत सलमानने कठोर भूमिका मांडली.

पहा व्हिडीओ-

या मुद्द्यावर बोलताना सलमानने अशा प्रकारचे बनावट व्हिडीओ तयार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची गरज असल्याचं म्हटलं. अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई झाली तरच लोकांमध्ये त्याचा धाक निर्माण होऊ शकतो, असं मत सलमानने मांडलं. सलमानने सोशल मीडियावर अशा कंटेंटसाठी अधिक कडक नियम आणि प्रभावी नियंत्रणाची गरज असल्याचंही सांगितलं. त्याच्या मते, AI तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने होणं गरजेचं आहे; मात्र एखाद्याची ओळख, आवाज किंवा प्रतिमा चुकीच्या पद्धतीने वापरण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ नये.

या एपिसोडमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख, रघुबीर यादव आणि मोहम्मद जीशान अय्यूब त्यांच्या ‘हुंकार’ या जियो हॉटस्टारवरील वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी सहभागी झाले होते. फातिमानेही सलमानच्या सोशल मीडिया आणि ट्रोलिंगसंबंधी भूमिकेचं कौतुक केलं. एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक मुद्द्यावर भूमिका मांडते तेव्हा त्याचा मोठा परिणाम होतो, असं फातिमाने सांगितलं. याआधी तिने महिला कलाकारांविषयीच्या सोशल मीडिया ट्रोलिंग आणि पापाराझींच्या वर्तनावरही भाष्य केलं आहे.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका