AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: भाई मोटा हो गया म्हणतात, घ्या.. करा आता ट्रोल; सलमान खानचा चढला पारा, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20: बिग बॉसच्या दुसऱ्या वीकेंड का वारला सुरुवात होण्यापूर्वीच घरातील घडामोडींची झलक समोर आली आहे. यामध्ये सलमान खान खूप संतापलेला दिसत आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

Salman Khan: भाई मोटा हो गया म्हणतात, घ्या.. करा आता ट्रोल; सलमान खानचा चढला पारा, नेमकं काय घडलं?
सलमान खान, बिग बॉस 20Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2026 | 8:09 AM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा दुसरा ‘वीकेंड का वार’ चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळच्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानचा राग पाहायला मिळणार असून, घरातील अनेक सदस्यांची तो चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन ट्रोलिंगच्या मुद्द्यावर बोलताना सलमानने स्वतःची टोपी आणि जॅकेट काढून थेट ट्रोलर्सना आव्हान दिल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्काऊट आणि अरिश्फा खान यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादानंतर स्काऊटने त्याच्या गेमिंग कम्युनिटीला अरिश्फाबाबत ट्रोलिंग करण्यास सांगितल्याचा मुद्दा समोर आला. याच प्रकरणावरून सलमानने स्काऊटला जाब विचारला. एखाद्या व्यक्तीशी मतभेद असतील तर त्यासाठी सोशल मीडिया कम्युनिटीचा वापर करून ट्रोलिंग का करायची, असा सवाल त्याने केला.

यानंतर सलमानने ट्रोलिंगचा अनुभव स्वतःच शेअर केला. सोशल मीडियावर त्याच्या वजनावर आणि दिसण्यावर केल्या जाणाऱ्या कमेंट्सचा उल्लेख करत त्याने, ‘भाई मोटा हो गया है’ अशा प्रकारच्या कमेंट्स आपल्यावरही केल्या जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर संतापलेल्या सलमानने आधी टोपी काढली, मग जॅकेट बाजूला फेकलं आणि ‘कर लो ट्रोलिंग’ असं म्हणत ट्रोलर्सना थेट आव्हान दिलं. पुढे त्याने शर्टही काढण्याचा प्रयत्न केल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. सलमानने यावेळी केवळ स्वतःच्या ट्रोलिंगबद्दलच भाष्य केलं नाही, तर एखाद्याच्या वजनावर, दिसण्यावर किंवा वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करण्यापूर्वी स्वतःकडे पाहण्याचा सल्लाही दिला.

पहा व्हिडीओ-

दरम्यान, या ‘वीकेंड का वार’मध्ये आसिफ खानच्या दाव्यांवरही सलमान प्रश्न विचारताना दिसणार आहे. नॉमिनेशननंतर आसिफने शोबाबत नाराजी व्यक्त करत तो पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. आता या वक्तव्यावर सलमान त्याच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचं प्रोमोमधून समोर आलं आहे. माही विज आणि यंग डीएसए यांच्यातील वादाचाही मुद्दा सलमानसमोर येणार आहे. माहीने यंगसाठी अपशब्द वापरल्याचा आरोप झाला होता. याशिवाय काजी तौकीरच्या काही डबल मीनिंग कमेंट्सवरून घरात झालेल्या वादावरही सलमान काय बोलतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. एकूणच, या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानचा आक्रमक अंदाज, ट्रोलिंगचा मुद्दा आणि घरातील सदस्यांमधील वाद यामुळे एपिसोड चांगलाच रंगणार असल्याचं दिसत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी