AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: इट्स डन सिस.., तुझ्या कॅफेमध्ये तुकाराम मुंढेंना पाठवेन; सलमानचा खास मैत्रिणीलाच इशारा

Tukaram Mundhe: सलमान खानने त्याच्या मैत्रिणीला कॅफेबद्दल दिलेला हा मजेशीर इशारा सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. एका बाजूला तो मैत्रिणीच्या नव्या व्यवसायाला पाठिंबा देताना दिसतोय, तर दुसरीकडे तुकाराम मुंढेंच्या सध्या सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेवर त्याने विनोदी भाष्य केलं.

Tukaram Mundhe: इट्स डन सिस.., तुझ्या कॅफेमध्ये तुकाराम मुंढेंना पाठवेन; सलमानचा खास मैत्रिणीलाच इशारा
Salman Khan and Tukaram MundheImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2026 | 10:36 AM
Share

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. आता त्याची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सलमानने त्याच्या मैत्रिणीच्या वांद्रे इथल्या नव्या कॅफेला शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मजेशीर अंदाजात उल्लेख केला. कॅफेमध्ये स्वच्छता आणि अन्नाची गुणवत्ता योग्य ठेवली नाही, तर मुंढेंना तपासणीसाठी पाठवेन, असा मिश्कील इशाराच त्याने दिला.

सलमानच्या मैत्रिणीने वांद्रे इथं नवीन कॅफे सुरू केलं आहे. या कॅफेची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना सलमानने त्याला पाठिंबा दर्शवला. मात्र, शुभेच्छा देतानाच त्याने त्याच्या खास विनोदी शैलीत कॅफेच्या स्वच्छतेची जबाबदारीही मालकावर टाकली. ‘स्वच्छता व्यवस्थित ठेव, नाहीतर मी तुकाराम मुंढेंना पाठवेन,’ अशा आशयाची त्याची पोस्ट आहे. त्याच्या या मजेशीर कमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

सलमानची पोस्ट-

‘सृष्टी माझी कॉफी रिफिल करून दे प्लीज, किंमत वाढवू नकोस, गुणवत्ता कायम ठेव, स्वच्छता राख, नाहीतर मी त्यांना (तुकाराम मुंढे) इथे पाठवेन आणि मग ‘इट्स डन सिस’. एकेदिवशी मी इथे माझं बीईंग ह्युमनचं टी-शर्ट आणि जीन्स घालून येईन. तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. या व्हिडीओत जी व्यक्ती बोलत आहे, तीच या कॅफेची मालकीण आहे आणि तीच बॅटमॅन आहे’, असं त्याने लिहिलं आहे.

महाराष्ट्र FDA आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे सध्या अन्न सुरक्षेबाबतच्या कठोर कारवाईमुळे चर्चेत आहेत. रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्रेते, डेअरी आणि इतर आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास FDAकडून कारवाई केली जात आहे. त्यांच्या धडक कारवाईमुळे त्यांची ‘कडक अधिकारी’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.

अलीकडेच मुंढे यांनी एका रेस्टॉरंटमधील अनुभवही सांगितला होता. मित्रासोबत जेवायला गेले असताना त्यांनी रेस्टॉरंटमधील काही नियमांचे पालन होत नसल्याचं पाहिलं. विशेष म्हणजे, मित्राने ऑर्डर केलेल्या पनीरबाबतही त्यांना संशय आला आणि ते बनावट असल्याचं त्यांनी ओळखलं. त्यानंतर संबंधित रेस्टॉरंटला त्रुटी दूर करण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात 3,100 हून अधिक तपासण्या, सुमारे 165 परवाने निलंबित आणि 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा हा केवळ कारवाईचा विषय नसून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी