Salman Khan: अभिनेत्रींच्या बॅकशॉटवरुन संतापला सलमान, नंतर एअरपोर्टवर थेट… पापाराझीची व्हिडीओ चर्चेत
Salman Khan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझीने केलेल्या कृत्याची चर्चा रंगली आहे. तो अभिनेत्रीला नेमकं काय म्हणाला? पाहा...

बिग बॉस २० च्या ‘वीकेंड का वार’ दरम्यान सलमान खानने असे काही केले ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. स्पर्धकांना लेक्चर देत असतानाच, त्याने ट्रोलर्स आणि पापाराझींना सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली. त्याने अभिनेत्रींचे मागून फोटो काढणाऱ्या पापाराझींना चांगलेच सुनावले. त्यानंतर आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पापाराझींशी बोलताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुजा चोप्रा विमानतळावर पोहोचून पापाराझींशी गप्पा मारताना दिसत आहे. ती पापाराझींशी तुम्ही तर पाठून फोटो काढणे बंद केले ना असे बोलते. त्यानंतर लगेच पापाराझी बोलतात का, आम्ही कधीच असे शॉट घेत नाही. आम्ही जे काही फोटो आणि व्हिडीओ शूट करतो ते परवानगी घेऊन करतो. त्यानंतर अभिनेत्री हसते आणि त्यांचे आभार मानते.
नेटकऱ्यांनी केले कौतुक
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट्स करत, सलमान खानला अनेकजण घाबरतात असे म्हटले. तसेच सलमानने जे पाऊल उचलले त्याचे देखील कौतुक केले आहे.
View this post on Instagram
सलमान खान सहसा ‘वीकेंड का वार’मध्ये स्पर्धकांना चांगलेच सुनावतो. अनेकदा त्यांना काय बरोबर आणि काय चूक आहे हे सांगतो. पण यावेळी त्याने जे केले ते या टीव्ही शोच्या इतिहासात अभूतपूर्व होते. सलमान अनेकदा पापाराझींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करतो आणि त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना फटकारताना दिसला आहे. पण यावेळी त्याची कृती पाहता, असे दिसते की जोपर्यंत तो त्यांना सुधारत नाही तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही.
काय म्हणाला होता सलमान?
सलमान खानने पापाराझींच्या पाठीमागून फोटो काढण्याच्या वृत्तीवर संताप व्यक्त केला होता. तो म्हणाला, “आजकाल एक ट्रेंड झाला आहे: जेव्हा एखादी स्त्री गाडीतून उतरते, तेव्हा कॅमेरा इथे (मांडीवर) असतो. जेव्हा ती गाडीत बसते, तेव्हा कॅमेरा इथे (कंबरेवर) असतो. जेणेकरून त्यांना कमरेचा शॉट घेता येईल. पापाराझींना पायाचा शॉट घेता येईल. कोणत्याही नायिकेला, कोणत्याही मुलीला पाठीमागून फोटो काढलेले आवडत नाहीत. काही जण म्हणतील, ‘काढा, मला काही हरकत नाही.’ पण ज्यांना हे आवडत नाही त्यांचं काय?”
