AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: 5 वर्षे बाबांशी बोलणं बंद..; आईवडिलांच्या लग्नाबद्दल सलमान खानचा खुलासा, आजोबांचा होता विरोध

Salman Khan: याच एपिसोडमध्ये सलमानने वडील सलीम खान यांची माफीदेखील मागितली. मुलगा म्हणून कधी त्यांचं मन दुखावलं असेल किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नसतील, तर त्याबद्दल त्याने माफी मागितली.

Salman Khan: 5 वर्षे बाबांशी बोलणं बंद..; आईवडिलांच्या लग्नाबद्दल सलमान खानचा खुलासा, आजोबांचा होता विरोध
सलमान खान, सलीम खानImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2026 | 3:20 PM
Share

Salman Khan: Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि ‘बिग बॉस 20’ या रिअॅलिटी शोमुळे सतत चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याने शोमध्ये स्वतःच्या कुटुंबाविषयी सांगितलेल्या एका जुन्या आठवणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान आणि आई सलमा खान यांच्या लग्नाला सलमानच्या आजोबांचा विरोध होता. एवढंच नव्हे, तर त्यांनी सलीम खान यांच्याशी तब्बल पाच वर्षे बोलणंही बंद केलं होतं. या विरोधामागचं कारण सांगताना सलमानने हा वाद धार्मिक नसून चित्रपटसृष्टीतील वातावरणाबद्दलच्या चिंतेतून निर्माण झाल्याचं स्पष्ट केलं.

‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’ भागात सलमान खान स्पर्धकांशी संवाद साधत असताना त्याने त्याच्या आयुष्यातील हा प्रसंग सांगितला. सलमानची आई सलमा खान यांचं माहेरचं नाव सुशीला चरक होतं. सलीम खान यांच्याशी लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, तेव्हा सलीम चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सलमानच्या आजोबांना म्हणजेच सलमा यांच्या वडिलांना आपल्या मुलीने चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तीशी लग्न करणं मान्य नव्हतं.

सलमानने सांगितलं की, या विरोधामागे धर्माचा कोणताही मुद्दा नव्हता. सलीम खान हे दिसायला देखणे होते आणि अभिनेता होण्याचं स्वप्न पाहत होते. मात्र, चित्रपटसृष्टीतील वातावरणात आपल्या मुलीला कसं राहावं लागेल, याची चिंता आजोबांना सतावत होती. त्यामुळे त्यांनी या लग्नाला विरोध केला. सलमाच्या भावंडांना मात्र सलीम खान यांच्याशी तिच्या लग्नाबाबत आक्षेप नव्हता.

पहा व्हिडीओ-

सलमानने पुढे सांगितलं, लग्नानंतर त्याच्या आजोबांनी सलीम खान यांच्याशी तब्बल पाच वर्षे संवाद साधला नव्हता. या कौटुंबिक नाराजीचा परिणाम नात्यांवर झाला. मात्र कालांतराने आजोबांच्या मनातील राग कमी झाला आणि त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चात्तापही झाला. सलमानने आणखी एक आठवण सांगितली. आई-वडिलांमध्ये भांडण झाल्यानंतर सलमा खान रागाने माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी आजोबांनी त्यांना माहेरी येण्यास मनाई केली नाही; मात्र भांडण झालं तरी पुन्हा माहेरी येऊन थांबण्याऐवजी पतीकडे परत जाण्याचा सल्ला दिला होता.

सलमानचा धाकटा भाऊ सोहैल खानच्या जन्मानंतर या नात्यातील दुरावा कमी झाला. सलमानने सांगितलं की, त्याचे आजोबा माहिमहून वांद्र्याला मिठाईचा डबा घेऊन आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या नातवंडांना मोठं होताना पाहण्याची संधी गमावल्याची खंत व्यक्त केली. नाराजीमुळे कुटुंबापासून दूर राहणं ही मोठी चूक होती, याची त्यांना जाणीव झाली होती.

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?