AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: सलमान खानने कमालच केली..; आठवड्याभरात ‘बिग बॉस 20’ला तब्बल इतके व्ह्यूज

Bigg Boss 20: बिग बॉस हा शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सूत्रसंचालक सलमान खानची जादू पुन्हा एकदा चालली आहे. कारण या शोने आठवड्याभरातील स्ट्रीमिंग व्ह्युअरशिपमध्ये 2 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Bigg Boss 20: सलमान खानने कमालच केली..; आठवड्याभरात 'बिग बॉस 20'ला तब्बल इतके व्ह्यूज
सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2026 | 12:52 PM
Share

Bigg Boss 20 सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या शोला सुरुवातीपासूनच मिळत असलेल्या प्रतिसादात आता आणखी मोठी भर पडली आहे. ‘बिग बॉस 20’ने आठवड्याभरातील स्ट्रीमिंग व्ह्युअरशिपमध्ये 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे 2026 मध्ये एका आठवड्यात 20 मिलियनहून अधिक युनिक व्ह्युअर्स मिळवणारा हा पहिला नॉन-क्रिकेट कंटेंट ठरला आहे. ‘ओरमॅक्स मीडिया’च्या स्ट्रीम व्ह्यू डेटानुसार, 20 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात बिग बॉस या शोला 2 कोटींपेक्षा जास्त प्रेक्षक मिळाले आहेत.

16.8 मिलियनवरून थेट 20 मिलियन पार

‘बिग बॉस 20’च्या व्ह्युअरशिपमध्ये अवघ्या एका आठवड्यात मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. 7 ते 13 सप्टेंबरदरम्यान शोला 16.8 मिलियन युनिक व्ह्यूअर्स मिळाले होते. त्यानंतर पुढील आठवड्यात हा आकडा 20 मिलियनच्या पुढे गेला. म्हणजेच एका आठवड्यात शोच्या प्रेक्षकसंख्येत तब्बल 3.2 मिलियनहून अधिक वाढ झाली आहे. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शो पाहणाऱ्या भारतीय युनिक प्रेक्षकांचा या आकडेवारीत समावेश होतो.

सलमान खानचा ‘बॉडी शेमिंग’वर थेट प्रहार

शोच्या वाढत्या चर्चेमागे ‘वीकेंड का वार’मधील सलमान खानचं वक्तव्यही महत्त्वाचं ठरलं. ऑनलाइन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर बोलताना सलमानने स्वतःचं उदाहरण दिलं. त्याच्या वाढत्या वयावर, वजनावर आणि बदललेल्या लूकवर सोशल मीडियावर होणाऱ्या कमेंट्सचा त्याने उल्लेख केला. यावेळी सलमानने कॅप आणि जॅकेट काढून आपली शरीरयष्टी दाखवली. एखाद्या व्यक्तीच्या वजनावर, दिसण्यावर किंवा वयावरून त्याची खिल्ली उडवण्याची गरज काय, असा मुद्दा त्याने मांडला. ‘

कतरिना कैफचाही अप्रत्यक्ष उल्लेख

सलमानने महिलांच्या शरीरावर होणाऱ्या कमेंट्सचाही मुद्दा उपस्थित केला. आई झाल्यानंतर एखाद्या महिलेच्या शरीरात नैसर्गिक बदल होतात आणि त्यावरून तिला ट्रोल करणे योग्य नाही, असं त्याने म्हटलं. त्याने अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही, मात्र या वक्तव्याची जोड सोशल मीडियावरील कतरिना कैफच्या पोस्ट-प्रेग्नन्सी लूकवरील ट्रोलिंगशी लावली जात आहे.

‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी झाला असून हा शो कलर्स टीव्हीवर प्रसारित होत आहे आणि जियो हॉटस्टारवर स्ट्रीम केला जात आहे. सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या या सिझनने आता डिजिटल व्ह्युअरशिपचा मोठा टप्पा गाठला आहे.

Follow Us
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला