Salman Khan: ‘मी व्हर्जिन…’, सलमान खानच्या ‘त्या’ वक्तव्याने उडालेली सर्वत्र खळबळ, आता कोणतं गुपित होणार उघड?
Salman Khan: अभिनेता सलमान खान याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना मोठं वक्तव्य केलेलं... 'मी व्हर्जिन...', आता येत्या काही दिवसांत भाईजान कोणतं गुपित उघड करणार याबद्दल लवकरच कळणार आहे... जाणून घ्या नेमकं होणार तरी काय?

Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींसोबत भाईजानचं नाव जोडण्यात आलं, पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सांगायचं झालं तर, खुद्द सलमान याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. सलमान याने दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ‘मा व्हर्जिन आहे…’, असं मोठं विधान केलं होतं. आता पुन्हा सलमान खान ‘कॉफी विथ करण’ शोच्या 9 व्या सीझनमध्ये स्वतःबद्दल मोठे खुलासे करताना दिसणार आहे…
सांगायचं झालं तर, ‘कॉफी विथ करण’ सीझन 9 हा करणच्या शोचा शेवटचा सीझन असणार आहे. आधीच्या सीझनमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्याबद्दल शोमध्ये मोठे खुलासा केले. यामध्ये सलमान खान देखील होता. ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या सीझनमध्ये दिसलेला, जेथे त्याने स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले होते.
View this post on Instagram
करणच्या शोमध्ये येणार सलमान खान…
शोमध्ये सलमान खान येणार असल्याची घोषणा करण याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केली आहे. पोस्टमध्ये सर्वात आधी सलमान खान याचा आयकॉनिक ब्रेसलेट दिसतो, त्यानंतर अभिनेत्याची झलक दिसते… यावेळी सलमान खान जाहिर करतो की, तो करणच्या शोमध्ये येणार आहे. करण याने हे देखील सांगितलं की, हा शेवटचा सीझन आहे. तर सलमान खान पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे की शेवटच्या सिझनमध्ये दिसणार आहे… याबद्दल काही कळू शकलेलं नाही.
सलमान खान काय म्हणालेला…
यापूर्वी जेव्हा सलमान खान ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या सीझनच्या पहिल्या भागात सहभागी झाला होता, तेव्हा करणच्या प्रश्नांना त्याने दिलेल्या उत्तरांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. याच भागात सलमानने आपण ‘व्हर्जिन’ असल्याचं जाहीर केलं होतं; तसेच ‘रॅपिड-फायर’ राऊंडमध्येही त्याने अनेक धक्कादायक उत्तरं दिली होती. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सलमानने हा शो नेहमीच अविस्मरणीय बनवला आहे. आता, तोच इतिहास पुन्हा एकदा घडतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. करणचा हा शो 14 ऑक्टोबरपासून Jio Hotstar वर प्रसारित होणार आहे.
