Samantha Ruth Prabhu : डिलिव्हरीच्या वेळी समंथाच्या बाळाच्या जीवाला होता धोका, 30 मिनिटं कुटुंबीय करत होते प्रार्थना, काय घडलेलं?

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूच्या डिलिव्हरीदरम्यान अडचणी आल्या होत्या. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

Samantha Ruth Prabhu : डिलिव्हरीच्या वेळी समंथाच्या बाळाच्या जीवाला होता धोका, 30 मिनिटं कुटुंबीय करत होते प्रार्थना, काय घडलेलं?
| Updated on: Nov 28, 2026 | 3:31 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नुकतीच आई झाली असून तिनं आणि तिचा पती, दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी मुलाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव देव निदिमोरू असं ठेवण्यात आलं आहे. मात्र, बाळाच्या जन्मापूर्वी समंथाच्या डिलिव्हरीदरम्यान काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिला सी-सेक्शन करण्याचा सल्लाही दिला होता. राज निदिमोरूच्या आत्यानं एका मुलाखतीत डिलिव्हरीदरम्यानचा हा अनुभव सांगितला आहे.

समंथा आणि राज यांच्या घरी 19 नोव्हेंबर 2026 रोजी मुलाचा जन्म झाला. बाळाच्या आगमनानं दोघांच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण असलं, तरी डिलिव्हरीपूर्वी संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं. राज निदिमोरूची आत्या आणि प्रसिद्ध गायिका डॉ. शोभा राजू यांनी समंथाच्या प्रसूतीदरम्यान नेमकं काय घडलं होतं, याबद्दल माहिती दिली.

Loading...

बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली होती नाळ

डॉ. शोभा राजू यांनी सांगितल्यानुसार, समंथाच्या डिलिव्हरीपूर्वी करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे बाळाच्या हालचालींबाबत कुटुंबीयांना चिंता वाटू लागली होती. मात्र, नंतर डॉक्टरांनी बाळाच्या हालचाली व्यवस्थित असल्याचं सांगितलं. त्यामुळे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला. पुढे, जेवणाच्या वेळी राज निदिमोरू यांनी फोन करून डॉक्टरांनी समंथाला सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म देण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर कुटुंबीय घाबरले. समंथा आणि बाळ सुखरूप असावं, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. डॉ. शोभा राजू यांच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी जवळपास 25 ते 30 मिनिटं प्रार्थना केली. त्यानंतर राज यांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी आनंदाची बातमी दिली. समंथानं सी-सेक्शनऐवजी नॉर्मल डिलिव्हरीद्वारे मुलाला जन्म दिला होता.

समंथाने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे मुलाला जन्म दिल्याचं समजताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे, समंथा आणि तिचा मुलगा देव दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं डॉ. शोभा राजू यांनी सांगितलं. हा संपूर्ण अनुभव म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर राज निदिमोरूची बहीण शीतल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा आणि सेंट मायकल चर्चला भेट दिली होती. या तिन्ही धार्मिक स्थळांवर त्यांनी देवसाठी प्रार्थना केली. देव मोठा झाल्यावर सर्व धर्मांचा आदर करणारा आणि प्रत्येकावर प्रेम करणारा माणूस व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच समंथा आणि राज यांच्या नव्या पालकत्वाच्या प्रवासासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us