AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राचं मुल बायकोच्या पोटात, पत्नीबद्दल समजातच…वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला भारतीय क्रिकेटर

भारतीय क्रिकेटपटूला त्याच्या मित्राने धोका दिला होता, त्याच्या मित्राने आणि त्याच्या बायकोने त्याला फसवले. यानंतर तो स्वत:ला सावरु शकला नव्हता.

मित्राचं मुल बायकोच्या पोटात, पत्नीबद्दल समजातच...वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला भारतीय क्रिकेटर
dinesh karthikImage Credit source: google
| Updated on: Nov 28, 2026 | 4:06 PM
Share

टीम इंडियाच्या दोन स्टार क्रिकेटपटूंमध्ये असेच काहीसे घडले, जे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते. ते अनेक वर्षे एकत्र देशांतर्गत क्रिकेट खेळले. या काळात त्यांची मैत्री खूप खास झाली. पण नंतर एका मुलीमुळे त्यांच्या आयुष्यात वादळ आले.  भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यात असंच घडलं.

२००७ ला जेव्हा २१ वर्षीय दिनेश कार्तिकने आपली बालपणीची मैत्रीण निकिता वंजाराला आपली जीवनसाथी म्हणून निवडले. निकिताचे वडील आणि दिनेशचे वडील हे देखील खूप चांगले मित्र होते. निकिता आणि दिनेश एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि एकत्र मोठे झाले होते. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली आणि दिनेश व निकिताने मुंबईत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

२०१२ मध्ये, तामिळनाडू कर्नाटकविरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामना खेळत होता. या सामन्यादरम्यान, दिनेश कार्तिकला त्याची पत्नी निकिता आणि त्याचा मित्र मुरली विजय यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल समजले. विजय आणि निकिता यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल कळल्यानंतर दिनेश कार्तिक पूर्णपणे खचून गेला आणि त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

२०१२ मध्ये दिनेश कार्तिकला घटस्फोट दिल्यानंतर, त्याच वर्षी निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केले. विजय आणि निकिताच्या मुलाचा जन्म २०१३ मध्ये झाला. अनेक वृत्तांनुसार, दिनेशला घटस्फोट देताना निकिता गर्भवती होती आणि ते बाळ मुरली विजयचे होते. २०१४ आणि २०१७ मध्ये निकिता आणि मुरली पुन्हा पालक झाले.

या घटनेनंतर, मुरली विजय आणि दिनेश कार्तिक कधीही एकत्र खेळले नाहीत. २०१८ मध्ये, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची एकत्र निवड झाली. हा त्या दोघांसाठी खूप अवघड क्षण होता. असे म्हटले जाते की या दौऱ्यादरम्यान त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. ”

यानंतर दिनेश कार्तिकसोबतच्या काही भेटींनंतर दीपिका त्याच्या प्रेमात पडली. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये लग्न केले. आता दीपिका आणि दिनेशला तीन मुले आहेत. दोन जुळे मुले आणि एक मुलगी आहे.

Follow Us
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?