AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलियोच्या जाहिराती केल्या पण मुलाला पायावर उभं..; कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांची उडवली खिल्ली

कॉमेडियन समय रैनाचा 'स्टिल अलाइव्ह' हा शो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या शोच्या एका सेगमेंटमध्ये समयने अमिताभ बच्चन यांच्या केबीसी एपिसोडचा किस्सा सांगत विनोद केला.

पोलियोच्या जाहिराती केल्या पण मुलाला पायावर उभं..; कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांची उडवली खिल्ली
Amitabh Bachchan and Samay RainaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 08, 2026 | 1:03 PM
Share

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका एपिसोडमध्ये पालकांवरून केलेल्या एका टिप्पणीमुळे कॉमेडियन समय रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा वाद इतका वाढला की त्याला युट्यूबवरील सर्व व्हिडीओज काढून टाकावे लागले होते. आता समय रैना ‘स्टिल अलाइव्ह’ या स्पेशल सेगमेंटद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात समय पुन्हा एकदा त्याच्या बेधडक अंदाजात कॉमेडी करताना दिसून आला. या एपिसोडमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना रोस्ट केलं आहे. त्याचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

या शोमध्ये ‘केबीसी’चा उल्लेख करत समय म्हणाला, “मी अमिताभ बच्चन यांच्यासमोर खोटं बोललो की माझी आजी त्यांची खूप मोठी चाहती आहे. खरंतर माझ्या आजीचं निधन होऊन सात वर्षे झाली आहेत. मी फक्त खेळासाठी आजीचा उल्लेख केला होता. तुम्ही भारतीय इंटरनेटवर प्रामाणिक नसता. केबीसीमध्ये जाताना मी विचार केला की, मी प्रत्येक ठिकाणी ‘हरामी’ बनतो, मग तिथे सभ्य वागू लागलो तर लोक मला म्हणतील की मी व्हर्सेटाइल क्रिएटर आहे. तिथे हॉटसीटवर बसल्यानंतर माझ्या डोक्यात उलटसुलट विचार येत होते. परंतु मी स्वत:ला नियंत्रणात ठेवलं. मला अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक विनोद करायचा होता, पण मी स्वत:ला सावरलं. सर.. तुम्ही पोलियोच्या इतक्या जाहिराती केल्या, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला स्वत:च्या पायावर उभं करू शकला नाहीत.” समयच्या या विनोदावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

पहा व्हिडीओ

केबीसीमध्ये उपस्थित राहिल्यानंतर पुढची परिस्थिती कशी निर्माण झाली असेल, याबद्दलही त्याने विनोद केला. “अमिताभ सरांनी तर मला पाहिलंच असेल. ते ट्विटरवर खूप सक्रिय असतात. मी त्यांना खूप आवडलो होतो. परंतु जेव्हा त्यांनी मला बातम्यांमध्ये पाहिलं असेल, तेव्हा सर्वांत आधी त्यांना असंच वाटलं असेल की मी खूप मोठा तीर मारला आहे. मला परम वीर चक्र मिळाला आहे. मग त्यांनी सर्वांना बोलावलं असेल. अभिषेक-अभिषेक हे बघ.. खूप चांगला मुलगा आहे हा. रेखा.. जया इकडे या, अरे ऐश्वर्या इथे ये. मग त्यांनी टीव्ही सुरू केला असेल आणि त्यानंतर त्यांची अवस्था ‘सूर्यवंशम’मधल्या भूमिकेसारखी झाली असेल”, असं तो म्हणतो. समय रैनाच्या या व्हिडीओ नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Follow Us
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन