‘सनई चौघडे’चा जय खऱ्या आयुष्यात कोणाच्या प्रेमात? 6 वर्षे डेटिंग, महाराष्ट्रीयन-हरियाणवी पद्धतीने लग्न

Raj Hanchnale's Wife: 'सनई चौघडे' या मालिकेत जय आणि शर्वरीची प्रेमकहाणी पुढे सरकत असताना राजने इन्स्टाग्रामवर खऱ्या आयुष्यातील पत्नीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर लग्नापर्यंत पोहोचलेली त्यांची ही लव्हस्टोरी तितकीच खास आहे.

| Updated on: Aug 16, 2026 | 9:37 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील जय आणि शरूची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय स्वभाव पण मनाने हळवा अशी राजची भूमिका आहे. पडद्यावर शर्वरीच्या प्रेमात अडकलेला जय खऱ्या आयुष्यात मात्र आधीच एका खास व्यक्तीसोबत संसार करत आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील जय आणि शरूची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय स्वभाव पण मनाने हळवा अशी राजची भूमिका आहे. पडद्यावर शर्वरीच्या प्रेमात अडकलेला जय खऱ्या आयुष्यात मात्र आधीच एका खास व्यक्तीसोबत संसार करत आहे.

2 / 5

राज हंचनाळेच्या पत्नीचं नाव मनिषा देसवाल असून या दोघांनी लग्न करण्यापूर्वी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केलं. या दोघांची लव्हस्टोरी हटके आहे. राज मूळचा कोल्हापूरचा असून मनिषा हरियाणाची आहे. 8 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्रीयन आणि हरियाणवी अशा दोन्ही पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.

3 / 5

पत्नी मनिषाच्या वाढदिवसानिमित्त जयने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. माझी पर्सनल असिस्टंट, माझी मॅनेजर, माझी अधिकृत पापाराझी, माझी एडिटर, माझं गुगल, 24 तास सोबत असणारी माझी स्टँडअप कॉमेडियन, माझी आहारतज्ज्ञ, माझी सर्वांत मोठी चाहती, माझी सर्वांत कठोर टीकाकार, माझी जिवाभावाची मैत्रीण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे.. माझी पत्नी, अशा शब्दांत राजने भावना व्यक्त केल्या आहेत.

4 / 5

मनिषाला फिटनेस, स्केचिंग, एनिमेशन आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे. मनिषाने कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केलंय. राजने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, 'तू अशी व्यक्ती आहेस, जिच्याशी मी सर्वकाही शेअर करतो आणि जी मला इतर कोणापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे ओळखतेस.'

5 / 5

लग्नापूर्वी अनेक वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर राज आणि मनिषा यांनी प्रेमाचं नातं लग्नात बदललं. दरम्यान राजच्याही करिअरमध्ये सध्या महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. 'सनई चौघडे'मधील जय खानोलकर ही त्याची भूमिका त्याच्या आधीच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us