AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : पोलिसांनी बेड्या घातल्या तेव्हा वडील… संजय दत्तने पहिल्यांदाच सांगितलं सत्य

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त कायम तुरुंगातील आठवणी सांगत असतो. आता देखील अभिनेत्याने हातात बेड्या घातल्यानंतर वडिलांना काय वाटलं असेल... याबद्दल सांगितलं. शिवाय तुरुंगात असताना अभिनेत्याने कोणत्या संकटांचा समाना केला... याबद्दल पाहिल्यांदाच सांगितलं.

Sanjay Dutt : पोलिसांनी बेड्या घातल्या तेव्हा वडील... संजय दत्तने पहिल्यांदाच सांगितलं सत्य
Sanjay Dutt
| Updated on: Oct 03, 2026 | 12:01 PM
Share

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्ता याच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. संजूबाबाने अनेक मुलाखतींमध्ये त्याने भोगलेल्या तुरुंगवासाबद्दल सांगितलं आहे. आता देखील अभिनेत्याने आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेते शेखर सुमन यांच्या शोमध्ये संजूबाबाने त्याच्या वाईट दिवसांच्या आठवणी सांगतल्या. शेखर सुमन यांनी सांगितलं, 2013 मध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असताना, अभिनेता संजय दत्तला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील अति-सुरक्षित अशा ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आले होते. असं असताना अभिनेत्याने मानसिक शांतता ठेवली. त्यानंतर सुमन यांनी विचारलं, ‘अशा परिस्थितीती सर्व काही संपवावं असा विचार केला नाही… ‘, यावर संजूबाबाने स्पष्टपणे नकार दिला.

शेखर सुमन यांच्यासोबत झालेल्या संवादात संजूबाबाने सांगितलं पहिल्यांदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या तेव्हा वडील हैराण झालेले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. संजय दत्त म्हणाला, ‘जेव्हा पहिल्यांदा पोलिसांनी मला बेड्या ठोकल्या तेव्हा माझ्या वडिलांना मोठा धक्का बसला, ते रडू लागले. स्वतःला सावरत त्यांनी असं देखीला विचारलं की, ‘माझ्या मुलासोबत तुम्ही हे काय करत आहात…? तेव्हा मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, बेड्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करुन घेताय? ही तर प्रक्रिया आहे. खरं तर, त्या परिस्थितीत मी स्वतः देखील पूर्णपणे खचलेलो.’

संजय दत्त असं देखील म्हणाला की, तिथल्या अधिकाऱ्यांना वाटायचं की, माझ्या सेलिब्रिटी स्टेटसशी संबंधित सुख-सुविधा काढून घेतल्या तर मी खचून जाईन. पण तसं काहीही झालं नाही. संजयबाबा म्हणाला, पण मला काहीच झालं नाही. मी खचलो नाही. त्यांना धक्का बसला होता. त्या लोकांनी माझी खिल्ली उडवली. त्यातील कोणीतरी माझ्याकडे आला आणि म्हणाल, येथे तुला सिगारेट मिळणार नाही. आता तू काय करशील? यावर मी उत्तर दिलं, सर, इथे बिडी तर मिळेल ना? संजय दत्त म्हणाले की, या सर्व बदलांमुळे त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. संजय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा संजूबाबाच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात मोठ्या अडचणी आल्या. पण आता संजूबाबा एकपेक्षा एक सिनेमांंच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अभिनेता खासगी आयुष्यात देखील आनंदी आहे. तिसरी बायको मान्यता आणि जुळ्या मुलांसोबत संजूबाबा आलिशान आयुष्य जगत आहे.

Follow Us
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा