AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khal Nayak 2: संजय दत्त पुन्हा बनणार बल्लू बलराम, 32 वर्षांनंतर बनणार ‘खलनायक’चा सिक्वेल

32 वर्षांनंतर संजय दत्तच्या ‘खलनायक’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की हा चित्रपट ते दिग्दर्शित करणार नाहीत, तर दुसरं कोणीतरी दिग्दर्शक असेल.

Khal Nayak 2: संजय दत्त पुन्हा बनणार बल्लू बलराम, 32 वर्षांनंतर बनणार ‘खलनायक’चा सिक्वेल
Khalnayak 2Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 18, 2025 | 7:01 PM
Share

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या चित्रपट कारकीर्दीत अनेक अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत आणि आता तो पुन्हा एकदा त्याच्या आयकॉनिक पात्रात परतणार आहेत. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘खलनायक’बद्दल, ज्याचा सिक्वेल बनणार आहे. या चित्रपटात संजय दत्त बल्लू बलरामच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी तो खूप पसंत केला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षितही प्रमुख भूमिकेत होती. मात्र, आता या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी दिग्दर्शक बदलले गेले आहेत.

‘खलनायक’बद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटाचा शेवट बल्लू बलराम तुरुंगात गेल्यानंतर झाला होता. सिक्वेलमध्ये त्यापुढील कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सुभाष घई यांनी दिग्दर्शित केला होता, पण त्यांनी सिक्वेलच्या घोषणेसह हे स्पष्ट केलं की आगामी सिक्वेलचे दिग्दर्शक ते स्वतः करणार नाहीत. चित्रपटात अनेक नवे चेहरेही दिसणार आहेत. अद्याप कोणाचेही नाव या चित्रपटासाठी घेतलेले नाही. तसेच अनेकांना प्रश्न पडला आहे की माधुरी दीक्षित दिसणार आहे की नाही.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

दिवाळीला होणार घोषणा

सुभाष घई यांनी स्वतः हा खुलासा केला आहे की त्यांनी चित्रपटाचे हक्क एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसला विकले आहेत. पण त्यांनी नाव उघड केलं नाही. सुभाष घई यांनी हेही सांगितलं की या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा 21 ऑक्टोबरला दिवाळीच्या निमित्ताने प्रोडक्शन हाऊसकडून केली जाईल. सुभाष घई जरी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नसले, तरी ते मार्गदर्शक म्हणून चित्रपटाशी जोडलेले राहतील.

‘खलनायक’ सिनेमॅटिक युनिव्हर्स

दिग्दर्शकांनी हेही सांगितलं की हा केवळ सिक्वेल नसेल, तर एक नव्या प्रकारचं ‘खलनायक’ सिनेमॅटिक युनिव्हर्स असेल, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत नायकांप्रमाणे ‘खलनायक’ असतील. मात्र, चाहत्यांचा प्रश्न माधुरी दीक्षित यांच्यावर अडकला आहे की त्या पहिल्या भागाप्रमाणे यात असतील की नाही. पहिल्या भागाबद्दल बोलायचं झालं, तर या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आता चाहत्यांना पूर्ण माहितीसाठी दिवाळीची वाट पाहावी लागेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.