Sanjay Dutt : व्यसनाच्या आहारी गेलेला संजय दत्त, दिग्दर्शाकनं सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता; या अभिनेत्याची लागली वर्णी, चमकलं नशीब
अभिनेता संजय दत्त याचा बायोपिक 'संजू'मध्ये दाखवलं होतं, की नशेमुळे संजय दत्तच्या हातून अनेक मोठमोठ्या कमाईचे चित्रपट निसटले होते. नशेमुळे त्याला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. याच नशेमुळे त्याच्या हातून अनेक सिनेमे निसटले.,

अभिनेता संजय दत्त याचा बायोपिक ‘संजू’मध्ये दाखवलं होतं, की नशेमुळे संजय दत्तच्या हातून अनेक मोठमोठ्या कमाईचे चित्रपट निसटले होते. नशेमुळे त्याला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. घरगुती तसेच प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा या नशेमुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते.
‘संजू’ या बायोपिकमध्ये दाखवल्याप्रमाणे अनेक बिग बजेट सिनेमे संजय दत्तच्या हातून निसटले. 80 च्या दशकात असाच एक मोठा सिनेमा नशेमुळे संजय दत्तच्या हातून निसटला होता. त्याच्या नशेमुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्याला ऐनवेळी सिनेमातून बाहेर काढले होते. याच नशेमुळेच त्याने आपला खास मित्रही गमावला होता.
‘युद्ध’ हा राजीव राय यांच्या दिग्दर्शन क्षेत्रातील पहिला चित्रपट होता. संजय दत्त यांच्याशी त्यांचे खास नाते होते. दोघेही चांगले मित्र पक्के यार होते. त्यामुळे पहिल्या सिनेमात आपल्या मित्राला हिरोचा रोल द्यायचा असे राजीव राय यांनी ठरवले होते. त्यामुळे कोणाचा विचार न करता ‘युद्ध’ या चित्रपटासाठी संजय दत्तला कास्ट करण्याचे ठरले.असे राजीव राय यांनी सांगितले.
मात्र जसे शूटिंग सुरू झाले तसे संजय दत्त् यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी वाढत गेल्या,त्यामुळे संजय भरपूर प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करू लागला. त्याच्या त्या परिस्थितीमुळे मला त्याची प्रचंड काळजी वाटू लागली,असे राजीव राय म्हणाले. राजीव राय यांनी पुढे सांगितले की, संजय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे खूप तणावाखाली होता. त्याने ‘युद्ध’ या चित्रपटाचे 20 – 30% शूटिंग आधीच पूर्ण केले होते. पण नंतर या सगळ्याचा परिणाम कामावर होत होता.
मग माझ्या लक्षात आलं हे असं फार काळ चालणं सिनेमासाठी चांगलं नाही. म्हणून मी संजय दत्तला चित्रपटातून काढून टाकलं. असे राजीव राय मुलाखतीत म्हणाले. संजयला चित्रपटातून काढून टाकल्यानंतर लगेच मी दुसऱ्या अभिनेत्याला घेतलं. पण मला वाटतं की मी हा त्यावेळी एक खूप चुकीचा निर्णय घेतला. ज्याचा मला आजही पश्चात्ताप होतो. कदाचित त्यामुळेच संजय दत्तशी असलेली माझी मैत्री तुटली. दिग्दर्शक राजीव राय यांनी नुकतीच पत्रकार विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
जैकी श्रॉफ यांना मिळाली भूमिका
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या युद्ध चित्रपटांत संजय दत्त ऐवजी जैकी श्रॉफ याने भूमिका साकारली. अनिल कपूर देखील या सिनेमात दुसऱ्या मुख्य भूमिकेत दिसला होता. जैकी श्रॉफने अॅक्टिंग केलेली प्रेक्षकांना प्रचंड आवडली. राजीव यांच्या दिग्दर्शनातील पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला.