सपना चौधरीच्या या गाण्याची 5 वर्षानंतरही क्रेझ कायम, 100 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं, आजही लोक..
सपना चौधरी आणि रेणुका पंवार यांच्या या गाण्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. 5 वर्षात या गाण्याला 100 कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

हरियाणवी डान्सर आणि लोकप्रिय स्टेज परफॉर्मर सपना चौधरीने आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ हरियाणातच नाही तर संपूर्ण देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टेज परफॉर्मन्सपासून म्युझिक व्हिडीओ, त्यानंतर ‘बिग बॉस’ आणि पुढे मोठ्या पडद्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. सपना चौधरीची लोकप्रियता आजही सोशल मीडियासह इंडस्ट्रीमध्ये देखील प्रचंड असून, तिच्या गाण्यांना यूट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळतात.
अशाच तिच्या एका गाण्याने तब्बल पाच वर्षांत 100 कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. हे गाणं म्हणजे ‘चटक मटक’. सध्या हेच गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रेणुका पंवारच्या आवाजाची जादू
‘चटक मटक’ या गाण्यात सपना चौधरीचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो, तर या गाण्याला आवाज दिला आहे लोकप्रिय गायिका रेणुका पंवारने. गाण्याचे बोल बिट्टू सोरखी यांनी लिहिले आहेत. 20 डिसेंबर 2020 रोजी ‘वत्स रेकॉर्ड्स’ या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं.
रिलीजच्या वेळी हे गाणं इतकं लोकप्रिय होईल, याची कदाचित कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, सोशल मीडियावर गाण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आणि काही वर्षांतच त्याने व्ह्यूजचा मोठा टप्पा गाठला.
सपनाच्या परफॉर्मन्सने गाण्याला मिळाली खास ओळख
‘चटक मटक’च्या म्युझिक व्हिडीओमध्ये सपना चौधरीचे वेगवेगळे लूक पाहायला मिळतात. कधी सूटमध्ये, तर कधी पारंपरिक हरियाणवी लहंगा-चुनरीमध्ये तिचा अंदाज चाहत्यांना विशेष भावला. रेणुका पंवारच्या आवाजासोबत सपनाच्या एनर्जेटिक डान्सने गाण्याची लोकप्रियता आणखी वाढवली.
सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरुवात स्टेज आर्टिस्ट म्हणून केली होती. ती आपल्या आईसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करायची. या क्षेत्रातील सुरुवातीचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. मात्र, अडचणींना न जुमानता तिने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं.
आज सपना चौधरीच्या नावाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज तिच्या गाण्यांना मिळणाऱ्या कोट्यवधी व्ह्यूजवरून सहज लावता येतो. ‘चटक मटक’ला मिळालेले 100 कोटींहून अधिक व्ह्यूज हे तिच्या लोकप्रियतेचं आणखी एक उदाहरण ठरलं आहे.
