AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar च्या फॅन पेजवरुन शुभमन गिलसाठी खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, ‘मजा आ गया’

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सुरु असताना एक पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष.. सर्वत्र फक्त 'त्या' पोस्टची चर्चा.. नेटकरी म्हणाले, 'मजा आ गया'

Sara Tendulkar च्या फॅन पेजवरुन शुभमन गिलसाठी खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, 'मजा आ गया'
| Updated on: May 22, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : क्रिकेटचा देव अशी जगभरात ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.. सारा कामय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. साराच्या अधिकृत अकाउंटशिवाय सोशल मीडियावर सारा तेंडुलकर हिच्या नावाचे अनेक फॅन पेज देखील आहेत. सारा तेंडुलकर हिच्या फॅन पेजवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील साराच्या फॅनपेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टने असंख्य चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फॅनपेजवरुन करण्यात आलेल्या पोस्टमुळे पुन्हा सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत..

आतापर्यंत सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. सोशल मीडियावर देखील त्यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. पण अद्याप दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.. दरम्यान, सारा तेंडुलकरच्या फॅन पेजवरून शुभमन गिलसाठी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे..

पोस्टमध्ये शुभमन याचे आभार मानले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे काल झालेला आयपीएल सामना. रविवारी 21 मे ला आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याच्या नॉट आऊट सेंच्युरीमुळे

आरसीबीचा पराभव झाला. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव झाला असता, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा टॉप ४ मध्ये पोहोचला असती. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला लॉटरी लागली आणि पलटण प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथीसटीम ठरली.

महत्त्वाचं म्हणजे, मुंबई इंडियन्स संघामध्ये सारा तेंडुलकर हिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर देखील खेळत आहे.. म्हणून सारा तेंडुलकर हिच्या फॅन पेजवरुन शुभमन गिल याचे आभार मानण्यात आले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा आणि शुभमन यांची चर्चा सुरु आहे.

सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. व्हायरल होत असलेल्या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.. पोस्टवर कमेंट करते नेटकरी ‘मजा आ गया…’ अशी प्रतिक्रिया देत आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.