सतीश शाह यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ॲम्बुलेंस दारात पोहोचली आणि…, डॉक्टर म्हणाले….

Satish Shah Death : शेवटच्या क्षणी कशी होती सतीश शाह यांची अवस्था? घरात बेशुद्ध पडले, ॲम्बुलेंस दारात पोहोचली आणि..., डॉक्टर म्हणाले...., रुग्णालयाकडून निवेदन जारी, अभिनेत्याच्या निधनाती सर्वात्र चर्चा....

सतीश शाह यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ॲम्बुलेंस दारात पोहोचली आणि..., डॉक्टर म्हणाले....
| Updated on: Oct 26, 2025 | 10:45 AM

प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते सतीश शाह यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे, तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता सतीश शाह यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क स्थित हिंदुजा रुग्णालयाने एक निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये सांगण्याता आलं आहे की, सतीश शाह यांची प्रकृती स्थिर नव्हती. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर सतीश शाह यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, सतीश शाह यांना शिवाजी पार्क येथील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला.

‘सीपीआर देऊन देखील नाही वाचले प्राण…

हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने माध्यमांना अधिकृत निवेदन जारी केलं आहे. जारी करण्यात आलेल्या निवेदननुसार, ‘सतीश शाह यांच्या निधनानंतर आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी शाह यांच्या प्रकृतीसंबंध इमरजेंसी कॉल आला. तेव्हा वैद्यकीय पथकासह एक रुग्णवाहिका ताबडतोब त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली.

जिथे सतीश शाह बेशुद्ध अवस्थेत आढळले. रुग्णवाहिकेत सीपीआर सुरू करण्यात आला, जो त्यांना पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये नेईपर्यंत चालू राहिला. आमच्या वैद्यकीय पथकाच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही सतीश शाह यांना वाचवता आले नाही.’ असं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करताना ते म्हणाले, ‘शाह हे एक लोकप्रिय कलाकार होते ज्यांचं भारतीय चित्रपट आणि दूरदर्शनमधील उल्लेखनीय योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त करतो.’

फिल्ममेकर अशोक पंडित यांनी व्यक्त केलं दुःख

फिल्ममेकर अशोक पंडित यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ‘जड अंतःकरणाने, मी तुम्हाला कळवू इच्छितो की आमचे मित्र आणि एक उत्तम अभिनेते सतीश शाह यांचं आज दुपारी 2:30 वाजता किडणी निकामी झाल्यामुळे निधन झालं. घरी असतानाच त्यांची प्रकृती खालावलीत त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अशोक पंडित पुढे म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केल आहे. मी पियुष पांडे यांच्या अंत्यसंस्कारावरून परतत असताना माझ्या कुटुंबाने मला सतीश यांच्या निधनाची माहिती दिली.’ सतीश शाह यांच अंतिम संस्कार रविवारी मुंबईत केले दुपारी 12 वाजता केली जातील.. असं देखील सांगण्यात येत आहे.