AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सखाराम बाइंडर’ नाटकाच्या माध्यमातून सयाजी शिंदेंचा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

विजय तेंडुलकर लिखित आणि 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं 'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे. यात सयाजी शिंदेंसोबत नेहा जोशी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारतेय. या नाटकाच्या टीमकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

'सखाराम बाइंडर' नाटकाच्या माध्यमातून सयाजी शिंदेंचा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात
Sayaji ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2025 | 5:20 PM
Share

नाटक म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. ही सामाजिक बांधिलकी जपत, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी ‘सखाराम बाइंडर’ या गाजलेल्या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा एक मोठा हात दिला आहे. सुमुख चित्र निर्मित या नाटकाचा दिल्लीतील शुभारंभाचा प्रयोग नुकताच हाऊसफुल्ल पार पडला. निर्माते मनोहर जगताप (CEO, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज) आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे या नाटकाला भक्कम कलाकारांची जोड मिळाली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबतच नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कसलेले कलाकार या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले असून, संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.

सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार

दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी यावेळी दिली. या सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ एक रुपया मानधन घेऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल.

“मी आयुष्यात परत नाटक करेन असं मला वाटलं नव्हतं. हे नाटक अत्यंत जिवंत, कालातीत आणि सुंदर आहे. म्हणून ते मला करावंसं वाटलं. महाराष्ट्रात पुरामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या नाटकातून जो नफा कमावला जाईल, तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील दहा प्रयोगांचं मानधन मी घेणार नाही. तेसुद्धा पूरग्रस्तांसाठी दिलं जाईल”, असं सयाजी शिंदे म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदे केवळ एक रुपये मानधनावर हे विशेष प्रयोग करत आहेत. कला आणि माणुसकीच्या या अनोख्या संगमाचे साक्षीदार होण्यासाठी पुढील प्रयोगांना अवश्य उपस्थित राहावे. कलाकार आणि निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा असून, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...