AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ नाटक पुन्हा रंगभूमीवर, ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार ‘लक्ष्मी’

विजय तेंडुलकर यांचं 'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत एक प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. नाशिकचे कवी प्रकाश होळकर यांच्यामुळे तिला ही भूमिका मिळाल्याचं तिने सांगितलं.

50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं 'सखाराम बाईंडर' नाटक पुन्हा रंगभूमीवर, ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार 'लक्ष्मी'
Sakharam BinderImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2025 | 12:20 PM
Share

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका मुलाखतीत तिने नाशिकच्या कवीमुळे आपल्याला ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल तिने सांगितलं.

‘लक्ष्मी’ची व्यक्तिरेखा आणि नाटकामागचा विचार

नेहा जोशीने सांगितलं की, “सखाराम बाईंडर हे नाटक 50 वर्षांपूर्वीचं असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेला मानणारी लक्ष्मी आणि त्या संस्थेच्या पूर्ण विरोधात असलेला सखाराम एकत्र आल्यावर त्यांचं नातं कसं जुळतं, हे नाटकातून पाहायला मिळेल. 50 वर्षांनंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत, हेही यानिमित्ताने समजून घेता येईल.”

नाटकाची निर्मिती आणि तांत्रिक बाजू

सुमुख चित्र निर्मित, या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. नाटकाचं दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केलं आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. संकेत गुरव यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलं आहे. नेहाने सांगितलं की, विजय तेंडुलकरांसारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या संहितेला धक्का लावणं योग्य नाही, त्यामुळे मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नाशिकच्या कवीमुळे नेहा जोशीला मिळाली ‘लक्ष्मी’

कवी प्रकाश होळकर यांनी नेहाचं नाव सयाजी शिंदे यांना सुचवलं आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या मनातही तिचं नाव होतं. “सयाजी शिंदे यांच्यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारासोबत काम करण्यापूर्वी सुरुवातीला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा ते एखादी भूमिका करतात, तेव्हा ते केवळ एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर येतात. त्यांच्या अभिनयात इतकं समरस होतात की त्यांचं मोठेपण आणि नावाचा लौकिक आपोआप बाजूला सारला जातो. त्यांच्यासोबत काम करताना कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जवळून अनुभवता आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं,” असं नेहा म्हणाली.

प्रेक्षकांना आवाहन

नेहाने प्रेक्षकांना हे नाटक पाहण्याचं आवाहन केलं आहे. “आता काळ बदलला आहे आणि कलाकारही वेगळे आहेत. तुम्हाला नाटक आवडेल किंवा नाही, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यामुळे आम्ही विजय तेंडुलकर यांच्या विचारांपर्यंत कितपत पोहोचू शकलो, हे समजून घेण्यास मदत होईल”, असं ती म्हणाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...