AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan Reaction on Smit Machchhar : ‘ खरा कॅप्टन काय असतो हे दाखवलंत’; शाहरुख खानने केलं स्मित मच्छारचं कौतुक

फ्लायदुबईचे पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसामुळे अनेकांचा जीव वाटला. जगभरातून त्यांचं कौतुक होत आहे. बॉलिवूड स्टार्सनीही त्यांची प्रशंसा केली. शाहरुख खाननेही पोस्ट केली आहे, काय म्हणाला किंग खान ?

Shah Rukh Khan Reaction on Smit Machchhar : ‘ खरा कॅप्टन काय असतो हे दाखवलंत’; शाहरुख खानने केलं स्मित मच्छारचं कौतुक
| Updated on: Oct 03, 2026 | 9:53 PM
Share

Shah Rukh Khan Reaction on Smit Machchhar : 30 सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानाने दुबई येथून तेल अवीवच्या दिशेने टेक ऑफ केलं. मात्र विमानातील 170 हून अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता कारण विमानाचे पायल स्मित मच्छार यांच्यावर, विमानाच्या को-पालटने हल्ला केला. मात्र त्याही परिस्थितीत मच्छार यांनी अतुलनीय शौर्य आणि धाडस दाखवत विमान क्रॅश होण्यापासून रोखलं, तसंच कॉकपीटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवासी आता आले, एकाने विमानाची कमान सांभाळत सेफ लँडिंग केलं, तर इतर प्रवाशांनी हल्लेखोर को-पायलटला पकडलं. या घटनेत स्मित म्च्छार गंभीर जखमी झाले.

श्वास रोखायाला लावणाऱ्या या घटनेनंतर स्मित मच्छार यांचं जगभरातून कौतुक होतंय. भारतीय नागरिक, पंतप्रधान मोदी, सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यात मागे राहिले नाहीत. अभिनेता सलमान खान, आर. माधवन, परेश रावल यांच्यानंतर आता किंग खान, अर्थात शाहरुखनेही स्मित मच्छारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून स्मितचं कौतुक केलंय. या रिअल हिरोबद्दल काय म्हणाला शाहरुख खान ?

शाहरुखने केली खास पोस्ट

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचं आणि कर्तव्यनिष्ठेचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याची दखल घेत अभिनेता शाहरुख खाननेही त्यांचं कौतुक केलं आहे.

शाहरुख खानने कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल लिहिताना म्हटलं, “ जेव्हा सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही ठामपणे उभे राहिलात. स्वतःला अशा परिस्थितीत मजबूत ठेवणं आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं सोपं नसतं. मात्र, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आणि खऱ्या कॅप्टनचा अर्थ दाखवून दिला. हे धैर्य आणि कर्तव्याचं खरं दर्शन आहे. तुम्हाला लवकर बरं वाटावं अशी सदिच्छा व्यक्त करतो, भारताचा तुमच्यावर विश्वास आहे” – असं शाहरुखने पोस्टमध्ये लिहीलं.

बाकी कलाकारांनीही थोपटली पाठ

शाहरुख खानच्या आधी अभिनेता परेश रावल यांनीही स्मित मच्छार यांना पाठिंबा दिला होता. नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा संदर्भ देत त्यांनी स्मित मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक केलं. तर अभिनेता सलमान खाननेही सोशल मीडियावर कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक करत लिहिलं, “कमाल केली पायलट जी. आम्ही सर्वजण तुम्हाला सलाम करतो. तुमच्यासोबत उड्डाण करणं आमच्यासाठी आनंदाची बाब असेल. छान काम केलं ब्रो, कॅप्टन स्मित मच्छार.”

याशिवाय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेते रवी किशन यांनीही स्मित मच्छार यांच्या धाडसाचं आणि कामगिरीचं कौतुक केलं आहे.

आता कशी आहे स्मित मच्छार यांची प्रकृती ?

स्मित मच्छार यांच्या तब्येतीबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची स्थिती सध्या स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. आपल्याला आता पूर्वीपेक्षा बरं वाटत असल्याचं स्मित मच्छार यांनी पंतप्रधानांना सांगितल्याची माहिती आहे.

अपघातानंतर त्यांच्यावर सुरुवातीला सौदी अरेबियातील तबूक येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अबुधाबीतील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर