AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद कपूरच्या अडचणीत वाढ… कुख्यात गुंडाच्या मुलीमुळे सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात

अभिनेता शाहिद कपूर याच्या अडचणीत मोठी वाढ... कुख्यात गुंडाच्या मुलीने केलेल्या आरोपांमुळे अभिनेत्याची आणि अन्य लोकांना चढवी लागेल कोर्टाची पायरी...

शाहिद कपूरच्या अडचणीत वाढ... कुख्यात गुंडाच्या मुलीमुळे सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात
Shahid Kapoor
| Updated on: Feb 04, 2026 | 11:29 AM
Share

अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘ओ रोमियो’ सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता शाहिद कपूर स्टारर ‘ओ रोमियो’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला… अशी मांगणी करत हुसेन उस्ताराच्या मुलीने न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या शाहिद कपूर स्टाररर ‘ओ रोमियो’ सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हुसेन उस्तारा नावाच्या कथित गुंडाच्या मुलीने सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. कुख्यात गुंड हुसेन उस्ताराच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित असल्याचा दावा केला जात आहे. आता याप्रकरणी 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सांगायचं झालं तर, दाऊद इब्राहिम याचा कट्टर वैरी अशी ओळख असलेला हुसेन उस्तारा याची मुलगी सनोबर शेख हिने सिनेमाचे निर्माते साजिद नाडियादवाला आणि विशाल भारद्वाज यांच्याविरुद्ध दावा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. ‘ओ रोमियो’ सिनेमा हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित असून झैदी यांनाही दाव्यात प्रतिवादी करण्यात आलं आहे. सिनेमात आपल्या वडिलांच्या व्यक्तिरेखाचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप सनोबर शेख हिने याचिकेत केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सनोबर शेख हिने याचिका दाखल केल्यानंतर निर्मात्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  सनोबर शेख यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली, ज्यांनी हा सिनेमा पूर्णपणे काल्पनिक असल्याचं उत्तर दिलं. त्यांनी असं म्हटलं की, कोणत्याही व्यक्तीशी कोणतंही साम्य निव्वळ योगायोग आहे आणि त्यासाठी कोणत्याही संमतीची आवश्यकता नाही.

‘ओ रोमियो’ सिनेमात अभिनेता शाहिद कपूर याने हुसैन उस्तारा यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा 13 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांचा असा दावा आहे की, हा एक काल्पनिक सिनेमा आहे. सनोबरने आरोप केला आहे की सिनेमाच्या प्रमोशन आणि टीझरमध्ये तिच्या वास्तविक जीवनाशी जुळणारे प्रसंग वापरले आहेत.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक