Nana Petekar: नाना पाटेकर – तनुश्री दत्ता यांचे वाद, शक्ती कपूरचं हैराण करणारं वक्तव्य, म्हणालेले तरी काय?
Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. ज्यामुळे अभिनेत्रीवर अनेकांनी टीका देखील केली आहे.. तर अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यावर वादावर हैराण करणारं वक्तव्य केलं होतं.

Nana Petekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना त्यांच्या चाहत्यांना निराश करु पुढच्या प्रवासासाठी गेले. आता नाना पाटेकर निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून नानांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर दुसरीकडे एकटी तनुश्री दत्ता, नाना पाटेकर यांच्या निधनावर आनंद व्यक्त करत आहे. तिने अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या आणि नानांच्या निधनाला ‘इव्हिल डेड’ असं म्हणटलं आहे…. सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केलेले, पण नानांनी सर्व आरोप फेटाळून लावले. एवंढच नाही तर अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील यावर हैराण करणारं वक्तव्य केलं होतं.
या गंभीर मुद्द्यावर शक्ती कपूर यांचं वक्तव्य ऐकून सगळेच हैराण झालेला. जेव्हा प्रकरण वादाच्या भोवऱ्यात होतं तेव्हा शक्ती कपूर यांना याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेते म्हणालेले, ‘मी कालच परदेशातून परतलो आहे, मी तेथे गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी गेलेलो… मला या केस बद्दल काहीही माहिती नाही..’. त्यानंतर शक्ती कपूर यांना संपूर्ण प्रकरण सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी हैराण करणारं वक्तव्य केलं. ‘हे तर 10 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे… त्यावेळी तर मी लहान होतो…’, असं खुद्द शक्ती कपूर म्हणाले होते.
प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमात नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली. तेव्हा सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं.. असे गंभीर आरोप तनुश्री हिने केलेले… सिनेमा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तनुश्री हिने 2018 मध्ये नाना पाटेकर यांच्यावर आरोप केलेल.
म्हणजे सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्ष झाल्यानंतर तनुश्रीने मीटू मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. ज्यामुळे शक्ती कपूर असं म्हणालेले की, ‘हे तर 10 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे… त्यावेळी तर मी लहान होतो…’, आता नानांच्या निधनानंतर देखील तनुश्री त्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहे.
