Nawazuddin Siddiqui कोणाला करायचा मारहाण? भाऊ शमास याने सादर केले पुरावे

Nawazuddin Siddiqui याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक होतेय वाढ; आता अभिनेत्याच्या भावाने सादर केले सबळ पुरावे... सर्वत्र नवाज विरोधात सादर केलेल्या पुराव्यांची चर्चा

Nawazuddin Siddiqui कोणाला करायचा मारहाण? भाऊ शमास याने सादर केले पुरावे
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी
| Updated on: Mar 08, 2023 | 10:22 AM

Shamaas Siddiqui On Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान भक्कम केलं आहे. पण सध्या नवाज त्याच्या खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पत्नी आणि भावाने गंभीर आरोप केल्यानंतर नवाजच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्याचा भाऊ शमास सिद्दीकी याने नवाज विरोधात काही सबळ पुरावे सोशल मीडियावर सादर केले आहेत ज्यामध्ये नवाज त्याच्या स्टाफला मारत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र नवाज विरोधात सादर केलेल्या पुराव्यांची चर्चा आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ शमास सिद्दीकी याने इन्स्टाग्रामवर काही व्हॉईस रेकॉर्डिंग शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याचा मॅनेजर फोन वर सांगत आहे की, अभिनेत्याने स्टॉफमधील एका मुलाच्या कानशिलात लगावली होती. शमास सिद्दीकी याच्या म्हणण्यानुसार, नवाज त्याच्या स्टॉफला रोज मारहाण करायचा. सध्या सर्वत्र नावजची चर्चा आहे.

शमास सोशल मीडियावर रेकॉर्डिंग शेअर करत म्हणाला, ‘होळीच्या दिवशी भेटवस्तूच्या स्वरुपात सापडलं… रुटीननुसार नवाज कायम त्याच्या स्टॉफला मारतो’ अभिनेत्याचा मॅनेजर सांगतो की, नवाजने स्टॉफच्या मुलाला दोन वेळा मारलं. सध्या शमासच्या भावाची सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

दरम्यान, नवाजने आलिया सिद्दीकीच्या आरोपांवर मौन तोडत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये अभिनेत्याने सर्व आरोप फेटाळले होते. अभिनेता म्हणाला, ‘माझा आणि आलियाचा घटस्फोट झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत. माझ्या मुलांना तिने ४५ दिवस घरात बंद केलं आहे. ते दुबईमध्ये शिकतात. ते सध्या शाळेत जात नाही. त्यांच्या शाळेतून मला सतत नोटीस येत आहेत.’

पुढे नवाज म्हणाला, ‘जवळपास दोन वर्षांपासून मी आलियाला दर महिन्याला १० लाख रुपये देत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा, मेडिकल, ट्रॅव्हल इतर सर्व गोष्टींची जबाबदारी मी घेतली आहे. आलियासाठी मुंबईत सी फेसिंग घर देखील खरेदी केलं.. पण ती माझं करिअर संपवण्याच्या मागे लागली आहे…’ सध्या सर्वत्र नवाजच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.