AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉलेज तरुणाईला वेड लावणारं 25 वर्ष जुनं गाणं; शंकर महादेवन यांच्या आवाजामुळे आजही प्रचंड सुपरहिट

25 वर्षांपूर्वीचं गाणं, जे कॉलेजमधील तरुणांमध्ये बनलं होतं प्रचंड सुपरहिट. शंकर महादेवन यांच्या आवाजामुळे ते गाणं आजही तरुणांच्या प्लेलिस्टमध्ये कायम.

कॉलेज तरुणाईला वेड लावणारं 25 वर्ष जुनं गाणं; शंकर महादेवन यांच्या आवाजामुळे आजही प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 6:10 PM
Share

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आजही तरुणाईच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मैत्री, प्रेम आणि तरुणाईकडे पाहण्याची नवी दिशा प्रेक्षकांसमोर आणली. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याचं संगीतही प्रचंड गाजलं. आता या चित्रपटाच्या लोकप्रिय ‘दिल चाहता है’ टायटल ट्रॅकच्या निर्मितीशी संबंधित एक रंजक किस्सा संगीतकार शंकर महादेवन यांनी सांगितला आहे.

शंकर-एहसान-लॉय या संगीतकार त्रिकुटाने या गाण्यावर मोठ्या प्रमाणात प्रयोग केले होते. विशेष म्हणजे गाण्याचे तब्बल 21 मिक्स तयार करण्यात आले होते. मात्र इतके मिक्स तयार करूनही अखेरीस चित्रपटात वापरण्यात आला तो गाण्याचा पहिलाच स्क्रॅच अर्थात रफ ट्रॅक!

21 मिक्सनंतरही पहिल्याच ट्रॅकवर शिक्कामोर्तब

स्पॉटिफायसाठी तयार करण्यात आलेल्या एका खास व्हिडीओमध्ये शंकर महादेवन यांनी एहसान नूरानी, लॉय मेंडोंसा, गायक शान आणि मेयांग चांग यांच्यासोबत गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी सांगितलं की, साउंड इंजिनियर विजय बेनेगल म्हणजेच बेनी यांनी या गाण्याचे जवळपास 21 मिक्स तयार केले होते.

मात्र अंतिमतः प्रेक्षक आज जे गाणं ऐकतात, ते त्याचं पहिलं स्क्रॅच व्हर्जन असल्याचं शंकर यांनी सांगितलं. या पहिल्या रफ ट्रॅकमध्ये बेसलाइन, ड्रम्स आणि काही सॅम्पल्सचा वापर करण्यात आला होता. प्रयोग करताना तयार झालेला हा साधा ट्रॅकच संपूर्ण टीमला सर्वाधिक आवडला आणि अखेरीस तोच फायनल करण्यात आला.

‘गाण्यात सगळं भरायची गरज नसते’

शंकर महादेवन यांच्या मते, संगीत तयार करताना अनेकदा गाण्यात जास्तीत जास्त गोष्टी भरण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तुमच्या धून, ग्रूव्ह आणि बेसलाइनवर विश्वास असेल तर गाण्यात अनावश्यक गोष्टी भरण्याची गरज नसते असं त्यांनी सांगितलं.

चांगला साउंड इंजिनियर मिक्सिंगच्या माध्यमातून गाण्यातील रिकामी जागाही योग्य पद्धतीने भरू शकतो. ‘दिल चाहता है’च्या टायटल ट्रॅकच्या बाबतीतही हाच प्रयोग यशस्वी ठरला आणि साधेपणातच गाण्याची खरी जादू असल्याचं टीमला जाणवलं.

आजही तरुणाईच्या मनात घर करून आहे चित्रपट

‘दिल चाहता है’ हा फरहान अख्तर यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट होता. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने शहरी तरुणाईतील मैत्री, प्रेम, स्वातंत्र्य आणि नात्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला. चित्रपटातील गोव्याचा रोड ट्रिपही विशेष लोकप्रिय झाला.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल