
मुंबई | बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहणारी एक गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य… बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या खासगी आयु्ष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण सेलिब्रिटी कायम त्यांच्या नात्यांवर मौन बाळगून असतात. पाश्चात्य देशांमध्ये, सेलिब्रिटी मीडियाकडून पैसे घेऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्याचं रहस्य उघड करतात असं अनेदा समोर आलं. पण बॉलिवूड कलाकार त्यांचं खासगी आयुष्य स्वतःपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सेलिब्रिटींचे असणारे अफेअर कधीही गुपित राहत नाहीत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा रंगल्यानंतर अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात देखील अडकले. पण काही सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखरे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या नात्याची चर्चा आज अनेक वर्षांनंतर देखील चाहत्यांमध्ये रंगेलेली असते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. नात्यात अक्षयने शिल्पाची फसवणूक केली असं देखील अनेकदा समोर आलं… पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सत्य सांगितलं नाही. २००७ मध्ये, जेव्हा शिल्पा शेट्टी ब्रिटिश रिअॅलिटी शो बिग ब्रदरची विजयी बनली तेव्हा मीडियाने तिचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला.
एक ब्रिटिश टॅब्लॉइडने अक्षय कुमार याला शिल्पा हिच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा करण्यासाठी तब्बल ४० हजार पाउंड म्हणजे जवळपास ३४ लाख रुपये ऑफर केले होते.. अक्षयसोबत शिल्पाचं नात कसं होतं? दोघांच्या नात्याची सुरुवात कधी झाली? त्यांच्या लव्ह लाईफमध्ये असं काय घडलं ज्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला..
पण ब्रिटिश टॅब्लॉइडने दिलेली मोठ्या रकमेची ऑफर अक्षय कुमार याने मान्य केली नाही.. यावर खिलाडी कु्मार म्हणाला, मी शिल्पाबाबत कोणाशीही बोललो नाही आणि कधीच बोलणार नाही. कितीही मोठी रक्कम मला दिली तरी चालेल. तर दुसरीकडे, शिल्पाने देखील अक्षयसोबत असलेल्या नात्यावर बोलणं टाळलं..
अक्षयसोबत असलेल्या नात्यावर शिल्पा म्हणाली, ‘आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो.. पण आता ती गोष्ट जुनी झाली आहे.. अक्षयला कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या मार्गांवर पुढे गेलो आहोत… ‘ सांगायचं झालं तर, अक्षयला त्याच्या लव्ह लाईफचा खुलासा करण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती. शिल्पाने नंतर खुलासा केला की, फक्त अक्षयच नाही तर अक्षयसोबतचे तिचे लव्ह लाईफ उघड करण्यासाठी तिला अनेकदा मोठ्या रकमेची ऑफरही देण्यात आली होती.
पाश्चात्य मीडियाने भारतातील सेलिब्रिटींना त्यांचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी अनेक वेळा मोठ्या रकमेची ऑफर दिली आहे, परंतु आजपर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीने त्यांच्या खासगी आयुष्याचा सर्वांसमोर खुलासा केला नाही.. पण अक्षय आणि शिल्पा यांची ‘लव्हस्टोरी’ तुफान गाजली…