Bollywood Actor : 19 वर्षीय मोलकरणीकडून अत्याचाराचा आरोप, उद्ध्वस्त प्रसिद्ध अभिनेत्याचं करिअर; इंडस्ट्रीला थेट रामराम, आता जगतोय असं आयुष्य

Bollywood Actor : बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर मोलकरणीनं अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अभिनेत्याचं करिअर उद्ध्वस्त झालं. आता अभिनेता काय करतोय? जाणून घ्या.

Bollywood Actor : 19 वर्षीय मोलकरणीकडून अत्याचाराचा आरोप, उद्ध्वस्त प्रसिद्ध अभिनेत्याचं करिअर; इंडस्ट्रीला थेट रामराम, आता जगतोय असं आयुष्य
| Updated on: Oct 27, 2026 | 9:49 PM

बॉलिवूड हे एक असं क्षेत्र आहे जिथे रातोरात मिळालेली प्रसिद्धी जितक्या लवकर ओसरते, तितक्याच लवकर ती नाहीशीही होऊ शकते. एखाद्याचं करिअर शिखरावर कधी पोहोचेल आणि रातोरात कधी संपेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. असाच एक स्टार म्हणजे शाइनी आहुजा. अभिनेत्यानं एकेकाळी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीत स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. मात्र, त्याच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी त्याचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं.’हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘गँगस्टर’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘वो लम्हे’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयानं शाइनी आहुजानं चित्रपटसृष्टीत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. मात्र, तो बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे.

शाइनी आहुजाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा जन्म एका लष्करी कुटुंबात झाला होता. अभिनेत्यानं जाहिरातींच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि एकाच वर्षात ४० हून अधिक जाहिरातींमध्ये दिसला.पेप्सीच्या जाहिरातीत दिसल्यानंतर, शाइनीला सुधीर मिश्रा यांचा चित्रपट मिळाला आणि त्यानंतर २००५ मध्ये त्यानं ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Loading...

काय घडलेलं नेमकं?

पदार्पणानंतर, शाइनीने ‘गँगस्टर’ (२००६), ‘वो लम्हे’ (२००६), ‘लाइफ इन अ मेट्रो’ (२००७) आणि ‘भूल भुलैया’ (२००७) यांसारख्या सलग यशस्वी चित्रपटांमुळे इंडस्ट्रीत स्थान मिळवलं. अभिनेता करिअरच्या शिखरावर असताना, २००९ मध्ये, एका १९ वर्षीय मोलकरणीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला, ज्यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली. या वादामुळे शाइनीचं बॉलिवूड करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. या आरोपांनंतर शाइनीला तुरुंगात टाकण्यात आलं आणि काही महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला.२०११ मध्ये, शाइनीला दोषी ठरवून सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण, त्यानं आपण निर्दोष असल्याचा दावा करणं सुरूच ठेवलं. नंतर, शाइनीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आणि त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला.

या तुरुंगवासाच्या आणि न्यायालयीन कार्यवाहीच्या काळात शाइनीचं बॉलिवूड करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. २०१५ मध्ये, शाइनीनं ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नुकसान झालं होतं. वादांमुळे त्याचे चित्रपट करिअर आधीच संपुष्टात आलं होतं. या आरोपांदरम्यान त्याला त्याची पत्नी अनुपम पांडेचा पूर्ण पाठिंबा मिळाला. या जोडप्याला एक मुलगीही आहे. या वादानंतर शाइनी आहुजानं स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केलं आहे. वृत्तानुसार, तो आता फिलीपिन्समध्ये राहत असून तिथं तो कपड्यांचा व्यवसाय करतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us