AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur MLC Election Result Today : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला जबर धक्का, काँग्रेसच्या उमेदवाराची जोरदार मुसंडी, नागपुरात आकडे फिरले!

आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यानुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारलीय. पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे.

Nagpur MLC Election Result Today : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला जबर धक्का, काँग्रेसच्या उमेदवाराची जोरदार मुसंडी, नागपुरात आकडे फिरले!
DEVENDRA FADNAVIS AND NAGPUR MLC ELECTION RESULT TODAYImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 9:46 PM
Share

Nagpur MLC Election Result Today : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीचा निकाल पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे. टपाली मतांची मोजणी झाली आहे. आता प्रत्यक्ष मतांच्या मोजणीस सुरुवात झाली असून आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नागपूर शिक्षक मतदारसंघातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येथे महायुतीला सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये जबर धक्का बसला आहे. असाच कल कायम राहिला तर ही जागा महायुतीच्या हातातून जाऊ शकते. समोर आलेल्या या आकड्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आघाडी 2 विरुद्ध 3 जागा अशी झाली आहे.

नागपुरात नेमकं काय घडलं? आकडेवारी काय सांगते?

आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यानुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारलीय. पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीचे म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना आतापर्यंत 28 हजार 536 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे महायुती म्हणजेच भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 27 हजार 751 मतं मिळाली आहेत.

अभिजित वंजारी 785 मतांनी आघाडीवर

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी केलेले नितेश कराळे यांना 14 हजार 243 मतं मिळाली आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या फेरीच्या अखेरीस अभिजित वंजारी हे 785 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच पहिल्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारलीय. त्यामुळे सध्यातरी महायुतीची धाकधूक वाढली आहे. हा कल असाच कायम राहिला तर महायुतीला जबर धक्का बसू शकतो.

आकड्यांमध्ये बदल,  पुढे काय होणार?

दरम्यान, सध्या फक्त मतमोजणीची पहिली फेरी पार पडली आहे. यात काँग्रेसच्या उमेदवाराने आघाडी घेतलीय. परंतु आणखी फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे कल कधीही बदलू शकतात. सध्या भाजपा पिछाडीवर असली तरीही पुढच्याच काही तासात काहीही होऊ शकतं. त्यामुळे आकडे वेगाने फिरत असून नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...