AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1034 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासोबत आशा भोसले यांनी गायलेलं खास गाणं, ICC स्पर्धेदरम्यान झालं होतं रिलीज

1034 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासोबत आशा भोसले यांनी गायलं होतं गाणं, ICC टूर्नामेंटच्या वेळी झाले होते रिलीज. गाण्याची रंगली होती प्रचंड चर्चा.

1034 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासोबत आशा भोसले यांनी गायलेलं खास गाणं, ICC स्पर्धेदरम्यान झालं होतं रिलीज
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 12, 2026 | 3:00 PM
Share

Asha Bhosle Passes Away: भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून संगीतप्रेमींनी एक अमूल्य ठेवा गमावला आहे.

आशा भोसले या त्यांच्या वर्सेटाइल गायनशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी हजारो गाणी गाऊन आपल्या आवाजाच्या जादूने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रोमँटिक, गझल, भजन, पॉप, कॅबरे अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप सोडली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसह खास गाणं

आशा भोसले यांनी अनेक नामांकित गायकांसोबत गाणी गायली, मात्र एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्यासोबतही गाणं गायलं होतं.

दोघांनी मिळून ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणं सादर केलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं हिंदीत होतं आणि त्याचे बोल स्वतः ब्रेट ली यांनी लिहिले होते. हे गाणं ICC Champions Trophy 2006 दरम्यान रिलीज झालं होतं आणि त्यावेळी ते विशेष चर्चेत आलं होतं.

ब्रेट लीचा क्रिकेटमधील दमदार कारकीर्द

ब्रेट ली हे क्रिकेटविश्वातील एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 1034 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि T20 क्रिकेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 718 विकेट्स घेतल्या 76 कसोटीत 310, 221 वनडेत 380 आणि 25 टी-20 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या.

सचिन तेंडुलकरशी खास नातं

आशा भोसले यांचं सचिन तेंडुलकर यांच्याशीही खास नातं होतं. त्या सचिनला “क्रिकेटचा सर्वात मोठा कलाकार” म्हणत असत. 1992 आणि 2023 च्या वर्ल्ड कपशी संबंधित कार्यक्रमांमध्ये त्या सचिनसोबत दिसल्या होत्या.

आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा आवाज, त्यांची शैली आणि त्यांनी दिलेला अमूल्य वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या आठवणी आणि गाणी कायमच रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा