AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himesh Reshammiya : Himesh Reshammiya : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर , वडिलांचे निधन, वयाच्या 87 व्या घेतला अखेरचा श्वास

गायक, संगीतकार हिमेश रेशमिया याच्या वडिलांचं बुधवारी निधन झालं. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Himesh Reshammiya : Himesh Reshammiya : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर , वडिलांचे निधन, वयाच्या 87 व्या घेतला अखेरचा श्वास
हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधनImage Credit source: social media
| Updated on: Sep 19, 2024 | 8:42 AM
Share

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यामुळ मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यातच आता एका प्रसिद्ध गायकाला वडिलांच्या वियोगाचं दु:ख सहन करावं लागत आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांचे निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर काल त्यांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे.

श्वास घेण्यास त्रास

रिपोर्ट्सनुसार, हिमेश रेशमियाच्या फॅमिली फ्रेंडने विपिन यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. ‘ हो, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ‘ असे त्यांनी नमूद केले. विपिन रेशमिया यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. हिमेश हे आपल्या वडिलांना गुरूस्थानी मानायचे. वडील हेच माझ्यासाठी देव असल्याचेही एकदा हिमेश यांनी म्हटलं होतं. वडिलांच्या निधनामुळे त्याच्या शोकाला पारावर उरलेला नाही.

कोण होते विपिन रेशमिया ?

विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (2014) आणि तेरा सुरूर (2016) ची निर्मिती केली होती. त्यांनी इन्साफ का सूरज (1990) नावाच्या चित्रपटासाठी देखील संगीत दिले होते, मात्र तो रिलीजच झाला नाही. विपिन रेशमिया आणि सलमान खान एका चित्रपटात एकत्र काम करणार होते, असे हिमेश यांनी एकदा नमूद केलं होतं, तेव्हाच त्याची सलमानशी ओळख झाली. 1998 मध्ये रिलीज झालेल्या ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात सलमान आणि काजोलची भूमिका होती, हिमेशने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्यानंतर त्याने सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी म्युझिक दिलं, त्याची अनेक गाणी लोकप्रिय ठरली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...