AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singer Nisar Wayanad: कॉन्सर्टच्या काही तास आधी ताप आला अन् गायकाचा मृत्यू झाला, इंडस्ट्रीत खळबळ

Singer Nisar Wayanad: एका प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला आहे. गायकाला दुबईत कॉन्सर्टपूर्वी केवळ ताप आला आणि अचानक निधन झाले. आता नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या...

Singer Nisar Wayanad: कॉन्सर्टच्या काही तास आधी ताप आला अन् गायकाचा मृत्यू झाला, इंडस्ट्रीत खळबळ
nisar wayanadImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 7:33 AM
Share

मल्याळम गायक निसार वायनाड यांचे दुबईत वयाच्या ४४ वर्षी निधन झाले. ते यूएईमध्ये विशेषतः अशा गायकीसाठी लोकप्रिय होते, ज्यात दिग्गज प्लेबॅक गायक उदित नारायण यांच्या आवाजाची झलक ऐकू येत असे. निसार नियमितपणे दुबई आणि यूएईतील इतर शहरांमध्ये होणाऱ्या संगीत कार्यक्रमांमध्ये आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत असत. त्यांच्या निधनाच्या बातमीने तिथे राहणाऱ्या मल्याळी समुदायात शोककळा पसरली आहे.

तीव्र तापानंतर रुग्णालयात दाखल

मीडिया रिपोर्ट्समध्ये निसार यांना शनिवारी दुपारी तीव्र ताप आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रिपोर्टनुसार त्यांच्या डेथ नोटिफिकेशनमध्ये मृत्यूचे कारण अॅसिडोसिस (जेव्हा शरीरातील द्रव आणि रक्तात अॅसिडची मात्रा खूप वाढते आणि पीएच पातळी सामान्यपेक्षा कमी होते) नोंदवले गेले आहे. निसार यांच्या अचानक निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना धक्काच बसला आहे. सर्वात भावुक करणारी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्यांचे निधन झाले, त्याच दिवशी त्यांना अजमानमध्ये एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करायचे होते. तो कार्यक्रम त्यांच्यासाठी रोजच्या प्रमाणेच एक शो होता. पण त्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. निसार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

उदित नारायण यांचे मोठे चाहते

निसार वायनाड यांनी कधीही हे लपवले नाही की उदित नारायण हे त्यांच्या आवडत्या गायकांपैकी एक होते. त्यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्सवरूनही दिसून येते की हिंदी चित्रपटातील या दिग्गज गायकाचा त्यांच्या संगीत प्रवासावर खोल प्रभाव होता. एका जुन्या पोस्टमध्ये निसार यांनी त्या भेटीच्या आठवणी जाग्या केल्या होत्या, ज्याची ते जवळजवळ दोन दशकांपासून वाट पाहत होते. त्यांनी सांगितले होते की उदित नारायण यांना भेटण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.

निसार हे मप्पिलापट्टू गायक म्हणून ओळखले जात असे. ही केरळच्या मालाबार प्रदेशातील पारंपरिक संगीत शैलीशी संबंधित एक महत्त्वाची विधा आहे. मात्र, त्यांचा संगीत प्रवास फक्त या शैलीपुरता मर्यादित राहिला नाही. ते विविध प्रकारची गीते आपल्या आवाजात सादर करत असत आणि विशेषतः हिंदी चित्रपटांच्या गाण्यांच्या त्यांच्या सादरीकरणांना लोकप्रियता मिळाली होती.

Follow Us
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान