AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीपेक्षाही कमी नाही गायक शानची पत्नी, कधी एअरहॉस्टेस असलेल्या राधिकाला पाहिलेत का?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान हे सतत त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकतात. आपण शानला अनेकदा पाहिले आहे. पण तुम्ही कधी त्याच्या बायकोला पाहिले का? नक्की पाहा...

अभिनेत्रीपेक्षाही कमी नाही गायक शानची पत्नी, कधी एअरहॉस्टेस असलेल्या राधिकाला पाहिलेत का?
Shaan WifeImage Credit source: Instagram/Radhika Mukherji
| Updated on: Sep 30, 2026 | 2:34 PM
Share

नव्वदच्या दशकातील रोमँटिक गाण्यांचा उल्लेख आला की अनेक गायकांची नावे आठवतात. उदित नारायण, कुमार सानू यांनी त्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मात्र एक गायक असा आहे, ज्याचा आवाज नव्वदच्या दशकापासून आजपर्यंत कानावर पडत आहे. त्याची गाणी अजूनही लाखो रसिकांना वेड लावतात. आपल्या साधेपणाने, नेहमीच्या स्मितहास्याने आणि जादूई गायनाने प्रत्येक हृदयावर राज्य करणाऱ्या शानच्या पत्नीला पाहिले आहे का?

गायक शानच्या एका स्मित हास्यावर आजही लाखो लोक फिदा होतात आणि त्यांचा आवाज ऐकताच कोणीही हरवून जाईल. पण २५ वर्षांपूर्वी हा बंगाली गायक एका पंजाबी मुलीवर फिदा झाला आणि ती मुलगी म्हणजे त्याची पत्नी राधिका. शान आणि राधिका यांची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटाच्या कथेसारखी आहे. ती ऐकताना आणि वाचताना वाटते की असा प्रेमसंबंध फक्त चित्रपटांत आणि पुस्तकांतच वाचायला मिळतात.

फिल्मी आहे शान आणि राधिका यांची प्रेमकहाणी

२५ वर्षांपूर्वी बंगाली कुटुंबात जन्मलेले शान एका पंजाबी आणि गुजराती कुटुंबातील मुली राधिका यांच्यावर फिदा झाले होते. त्या वेळी शान यांच्याकडे ना खिशात पैसे होते, ना डोळ्यांत मोठे स्वप्ने होते. दोघांकडे फक्त एकमेकांबद्दल अढळ प्रेम आणि चांगल्या-वाईटात एकमेकांची साथ देण्याचा निर्धार होता. शान यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण आज आपण त्याची पत्नी राधिकाबद्दल जाणून घेऊया, जी गेल्या २५ वर्षांपासून गायकाच्या आयुष्यात गोडवा भरून देत आहेत.

राधिका पंजाबी आणि गुजराती कुटुंबातील आहेत. शानशी लग्न करताना तिचे वय अवघे २२ वर्षे होते. राधिका आणि शान यांनी सेलिब्रिटी शेफ अमृता रायचंद यांच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. त्या शोमध्ये दोघांनी आपल्या प्रेमकहाणीबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. राधिका यांनी सांगितले होते की, त्या लहानपणापासून अजिबात महत्वाकांक्षी नव्हत्या. त्या नेहमी लग्नाची स्वप्ने पाहत असत आणि लहानपणीच त्यांनी ठरवले होते की २२ वर्षांच्या आत लग्न करायचे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...