AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलताच सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

गेल्या काही दिवसांपासून महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. स्मृतीचे लग्न पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलताच सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Smriti Mandhana And suniel ShettyImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 29, 2025 | 12:28 PM
Share

सांगलीची मुलगी आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न बंधनात अडकणार होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे हा लग्न सोहळा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टीने जेमिमा रोड्रिग्स आणि स्मृती मानधनासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात जेमिमाने WBBL सोडून स्मृतीसोबत राहण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

सुनील शेट्टी हे अशा अभिनेत्यांमध्ये एक आहेत, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल पूर्ण माहिती असते. आता त्यांनी भारतीय क्रिकेटर जेमिमा रोड्रिग्स आणि तिची मैत्रिणी स्मृती मानधनासाठी हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. चला जाणून घेऊया की सुनील शेट्टीने जेमिमा आणि स्मृती मानधानसाठी काय म्हटले आहे.

भारतीय क्रिकेटर्ससाठी सुनील शेट्टीची पोस्ट

स्मृती मानधना सध्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहेत. स्मृती, पलाश मुच्छल सोबत लग्न करणार होती, पण लग्नापूर्वी तिचे वडिल आजारी पडले. वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले. शुक्रवारी सुनीलने त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर एका वृत्तपत्राचे कटिंग शेअर केले आहे. हेडलाइन होती, जेमिमाने मानधनासोबत राहण्यासाठी WBBL सोडण्याचा निर्णय घेतला.

सुनील शेट्टीने कटिंगसोबत एक भावुक नोट लिहिली, सकाळी सकाळी हे आर्टिकल पाहिले आणि हृदय भरून आले. जेमिमाचा WBBL सोडून स्मृतीसोबत राहणे कोणतेही मोठे विधान नाही, फक्त शांतपणे साथ देणे. हे खरे टीममेट्स करतात. सरळ, साधे, खरे.

स्मृति मंधाना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलले

23 नोव्हेंबरला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत कंपोजर-फिल्ममेकर पलाश मुच्छलचे लग्न अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलले गेले. कारण लग्नापूर्वी काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची तब्बेत बिघडी. लवकरच पलाशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. स्मृतीने प्री-वेडिंगचे सर्व फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकले. पलाशच्या आई चे म्हणणे आहे की लवकरच लग्नाची नवीन तारीख जाहीर केली जाईल. पलाश आणि स्मृतीचे वडील आधीच बरे होत आहेत. यामध्ये पलाश बद्दल अनेक अफवा पसरल्या, पण अद्याप दोघांकडून कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?