AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana Wedding: स्मृतीच्या लग्नात फक्त इतक्याच लोकांना आमंत्रण… दिग्गज आणि सेलिब्रिटींना नो एन्ट्री…

Smriti Mandhana Wedding : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या लग्नासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. स्मृती लवकरच तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सध्या सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

Smriti Mandhana Wedding: स्मृतीच्या लग्नात फक्त इतक्याच लोकांना आमंत्रण... दिग्गज आणि सेलिब्रिटींना नो एन्ट्री...
smriti mandhana and palash muchhal wedding
| Updated on: Nov 23, 2025 | 8:46 AM
Share

Smriti Mandhana and Palash Muchhal : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश यांचं लग्न होणार आहे. लग्नापूर्वीच्या सर्व विधी देखील झाल्या असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सांगली याठिकाणी स्मृती हिचं लग्न होत आहे आणि गावी लग्न व्हावं अशी स्मृती हिची इच्छा होती. ज्यासाठी सयाजी हॉटेल बूक करण्यात आला आहे. तर लग्नात किती पाहुण्यांना बोलावलं असेल, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…

रिपोर्टनुसार, पलाश याचे पूर्वीच सांगितलं होतं की, इंटिमेट अफ्टरनून वेडिंग असेल… असं पलाश याने स्पष्ट केलं होतं. ज्यामध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातील जवळचे व्यक्ती काही मित्रमंडळी असतील… सुरुवातीपासूनच, दोघांनी भव्य आणि गोंगाटपूर्ण लग्नाऐवजी शांत, मर्यादित आणि पारंपारिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं.

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नात किती लोक असतील हे देखील स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलाश बाजूने 70 आणि स्मृती हिच्या बाजूने 70 मिळून 140 पाहूणे लग्नात उपस्थित राहणार आहेत. स्मृती विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंसह, आधीच तिथे पोहोचली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्याशिवाय, इतर कोणतेही मोठे सेलिब्रिटी आणि दिग्गज स्मृतीच्या लग्नात दिसणार नाहीत.

पलाश मुच्छल याच्या कुटुंबातील अनेक सदस्य लग्नस्थळी पोहोचले आहेत. इंदूरमधील त्यांच्या कुटुंबातील सुमारे 20 सदस्य लग्नाच्या तयारीत सक्रियपणे सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. हळदी समारंभातही त्यांची उपस्थिती दिसून आली.

हे सुद्धा वाचा –  पलाश मुच्छल – स्मृती मानधना यांच्या वयात किती अंतर आणि दोघांचं नेटवर्थ

स्मृतीच्या वतीने महिला संघातील काही खेळाडू उपस्थित राहतील, तर संगीत क्षेत्रातील पलाश मुच्छल याच्या जवळच्या लोकांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. पण संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. मोठ्या सेलिब्रिटी, कडक सुरक्षा आणि लांब पाहुण्यांची यादी असलेल्या सामान्य बॉलिवूड कार्यक्रमांपेक्षा वेगळे, हे लग्न साधेपणा आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याबद्दल असल्याचं दिसून येतं.

पलाश मुच्छल – स्मृती मानधना यांच्या वयात किती अंतर

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या वयाच्या फरकाबद्दल बोलायचे झाले तर, पलाशचा जन्म 22 मे 1995 मध्ये झाला. तर स्मृती मानधना हिचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला. म्हणजे, स्मृती आणि पलाश यांच्या वयात फक्त एक वर्ष आणि तीन महिन्यांचा फरक आहे…

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!