स्मृती मानधना हिची नणंद – भाऊजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव, सलमान हृतिक सोबत केलंय काम
Smriti Mandhana and Palash Muchhal: सध्या सर्वत्र स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असताना, पलाश याची बहीण आणि भाऊजी यांच्याबद्दल देखील चर्चा रंगली आहे... दोघे देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहेत...

Smriti Mandhana and Palash Muchhal: भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधना सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेच आली आहे… स्मृती लवकरच बॉयफ्रेंड पलाश मुच्छल याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे… दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्यामुळे अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. स्मृती आणि पलाश यांचे फोटो व्हायरल होत असताना, पलाश याची बहीण आणि भाऊजी देखील चर्चेत आहेत, जे बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे.
सांगायचं झालं तर, स्मृती हिची होणारी नणंद पलक मुच्छल आणि तिचा नवरा मिथुन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पलाश मुच्छल हा एक भारतीय संगीतकार आणि सिनेमा निर्माता आहे, त्याने अनेक बॉलिवूड गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्याची मोठी बहीण पलक मुच्छल आहे, जी एक प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आहे. तिने अभिनेता सलमान खान याच्यापासून ते हृतिक रोशन पर्यंत यांच्या सिनेमांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पलक मुच्छलची एकूण संपत्ती 20 ते 50 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

पलाश मुच्छल याचे भाऊजी
पलाश मुच्छल याचे भाऊजी आणि पलक मुच्छल हिचे पती मिथुन हे एक लोकप्रिय बॉलीवूड संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि संगीतकार आहेत. मिथुन याने आशिकी 2 सिनेमात संगीतकार म्हणून काम केलं आणि ‘सनम रे’ सिनेमाचं दिग्दर्शन देखील केलं.
पलक मुच्छलने इन्स्टाग्रामवर भाऊ पलाश मुच्छलच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये मिथुन नवऱ्या मुलाला हळद लावताना दिसत आहे. याशिवाय, पलक मुच्छलने स्मृती मानधनाला प्रपोज करतानाचा व्हिडिओ हार्ट इमोजीसह इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
View this post on Instagram
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार आहे. दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, ज्या मैदानावर स्मृती हिने वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेतली, त्याच मैदानावर पलाश याने स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केला.
