AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोहैल खानने अखेर सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला “मी तिच्यावर खूप प्रेम करायचो पण..”

अभिनेता सोहैल खानने घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 'अलायन्स' या शोमध्ये त्याने सीमा सजदेहपासून विभक्त झाल्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. सोहैल आणि सीमा दोघं सध्या या शोमध्ये एकत्र आहेत.

सोहैल खानने अखेर सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला मी तिच्यावर खूप प्रेम करायचो पण..
Seema Sajdeh and Sohail KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2026 | 9:08 AM
Share

अभिनेता आणि निर्माता सोहैल खान सध्या ‘अलायन्स’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोमध्ये त्याची नुकतीच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली. विशेष म्हणजे आधीपासूनच या शोमध्ये त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा स्पर्धक आहे. ‘अलायन्स’च्या माध्यमातून सोहैल आणि सीमा घटस्फोटानंतर पुन्हा एकाच छताखाली आले आहेत. जेव्हा शोमध्ये सोहैलची एण्ट्री झाली, तेव्हा त्याला पाहून सीमासुद्धा खुश झाली होती. या दोघांना अशा पद्धतीने पुन्हा एकत्र पाहून शोमधील इतर स्पर्धक आणि चाहतेसुद्धा खुश झाले आहेत. यादरम्यान सोहैल खान त्याच्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. सोहैलने स्वत: घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून त्याच्यामुळे संसार मोडल्याची कबुली दिली आहे.

घटस्फोटामागील कारण

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेव्हा सीमा सजदेहची एण्ट्री झाली, तेव्हा सोहैलने तिच्यासाठी ग्रीन-टी बनवली होती. तेव्हा सूत्रसंचालक निखिल चिन्नपा त्याला विचारतो की, “एक स्त्री घराची वाईट वाट लावू शकते आणि घर चांगलंही करू शकते. तुझ्या संसारात कोणाचा हात होता?” त्याचं उत्तर देताना सोहैल खान म्हणाला, “त्यावेळी माझं काम ठीक चालत नव्हतं. त्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. माझ्या याच वागण्यामुळे मी तिला गमावलं आहे. तिच्यावर मी खरंच खूप प्रेम करायचो. सीमा माझ्या दोन मुलांची आई आहे. त्यामुळे आता माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमापेक्षा जास्त आदर आहे.”

आजही सीमाकडे घराची चावी

सोहैल खानने या शोमधील स्पर्धक झैद दरबारशी बोलतानाही त्याच्या मुलांसोबतच्या आणि सीमासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने सांगितलं की निर्वाण आणि योहान ही दोन्ही मुलं सध्या त्याच्या सोबतच राहतात. तर सीमा मुलांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा त्याच्या घरी जाते. सीमाकडे आजही त्याच्या घराची चावी असल्याचा खुलासा सोहैलने यावेळी केला.

सोहैल खान आणि सीमा सजदेह या दोघांची पहिली भेट चंकी पांडे यांच्या साखरपुड्यात झाली होती. सीमाला पाहताच क्षणी सोहैल तिच्या प्रेमात पडला होता. दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने सीमाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. अखेर कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन सीमा आणि सोहैलने पळून लग्न केलं होतं. आधी आर्य समाज मंदिरात दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं, त्यानंतर निकाहनामा वाचला. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये सोहैल आणि सीमा विभक्त झाले.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश