Salman Khan : मी त्याच्या आठ ‘वन-नाईट स्टँड्स’ला कंटाळले होते…सलमानची एक्स गर्लफ्रेंड झालेली हतबल, अभिनेत्यावर केलेला छळाचा आरोप
Salman Khan Ex Girlfriend : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याच्यावर आरोप केले होते. अभिनेत्याचे आठ वन नाईट स्टॅन्ड होते, असंही अभिनेत्री म्हणालेली.

सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड, सोमी अली कायम चर्चेत असते. अभिनेत्री सलमान खानवर वारंवार टीका करत असते. काही वर्षांपूर्वी सोमीनं सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यात सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं होतं. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लॉरेन्स बिश्नोईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोमीने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही खुलासा केला होता.
सलमानबद्दल काय म्हणालेली सोमी अली?
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सोमी म्हणाली, ‘मी अनेक वर्षांपासून अभिनयात सक्रिय नाही, पण मी अमेरिकेत माझ्या एनजीओवर काम करत आहे. लोक अजूनही मला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखतात. हा माझ्यासाठी सर्वात मोठा शाप आहे. मी अमेरिकेत खूप चांगली कामं केली आहेत आणि बरंच काही मिळवलं आहे, तरीही लोक मला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखतात.’
सोमी पुढे म्हणाली, ‘सलमान अजूनही खेळाच्या मैदानावरील किंवा हायस्कूलमधील गुंडासारखा वागतो. तो त्याच्या इन्सिक्योरिटीमुळे लोकांना त्रास देतो.’ सलमानसोबतच्या नात्याबद्दल सांगताना सोमी म्हणाली, ‘सलमानची एक पद्धत आहे. मुली सहसा त्याचं खरं स्वरूप ओळखण्यापूर्वी सात वर्षे त्याच्यासोबत राहतात. गंमत म्हणजे तो त्यांच्याशी कधीच नातं तोडत नाही, उलट, ती मुलगीच त्याला सोडून जाते. सलमानचे खरे रंग ओळखायला तिला सात वर्षे लागतात.’
सोमी म्हणाली की, सलमान खानच्या आठ ‘वन-नाईट स्टँड्स’मुळे तिनं इंडस्ट्री सोडली. जेव्हा एका रेडिट युजरने तिला बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली, ‘कारण मी केवळ एकाच नाही, तर त्याच्या आठ ‘वन-नाईट स्टँड्स’ला कंटाळले होते. मला रोज होणारा शारीरिक आणि शाब्दिक छळही सहन होत नाही. जेव्हा सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला, तेव्हा मी त्याला सोडलं. मी त्याच्या ‘वन-नाईट स्टँड्स’ला कंटाळले होते आणि मी माझं शिक्षण पूर्ण केलं.’
दरम्यान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा झाल्या. ‘हम दिल दे चुके सनम‘च्या सेटवर ऐश्वर्या आणि सलमान यांच्यातील जवळीक वाढली. मात्र, काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर सलमाननं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप, ऐश्वर्यानं केलेला.