AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोनाक्षीने दिलं असं उत्तर, वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता खुद्द सोनालीने उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये तिने प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोनाक्षीने दिलं असं उत्तर, वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!
Sonakshi and ZaheerImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 17, 2025 | 8:52 AM
Share

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या गरोदरपणाची जोरदार चर्चा आहे. खुद्द सोनाक्षीने यावर अनेकदा प्रतिक्रिया दिली आहे. परंतु तरीही या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे. गरोदरपणावरून सतत कमेंट करणाऱ्यांना आणि चर्चा करणाऱ्यांना तिने सडेतोड आणि तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. घरातच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’अंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने या दोघांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु या ट्रोलिंगला न जुमानता दोघंही एकमेकांवर मोकळेपणे प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

सोनाक्षी आणि झहीर हे नुकत्याच एका दिवाळी पार्टीत गेले होते. यावेळी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सोनाक्षीने पोट झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता आणखी एका दिवाळी पार्टीचे फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये त्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ‘मानवी इतिहासातील सर्वांत जास्त काळ गर्भधारणेचा वर्ल्ड रेकॉर्ड (आमच्या प्रेमळ आणि अति बुद्धिमान मीडियानुसार 16 महिने आणि त्यावर) तेसुद्धा फक्त पोटावर हात ठेवून पोझ दिल्याबद्दल. या चर्चांवर आमची प्रतिक्रिया पहायची असेल तर शेवटच्या स्लाइडपर्यंत स्क्रोल करा.. आणि नंतर या दिवाळीत चमचमत राहा’, असं तिने लिहिलंय.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

एका दिवाळी पार्टीत झहीरसुद्धा सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवरून खिल्ली उडवतो. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना तो जाणूनबुजून तिच्या पोटावर हात ठेवतो. त्यानंतर सोनाक्षीसुद्धा जोरजोरात हसू लागते. “आम्ही फक्त मस्करी करतोय”, असं तो पापाराझींना स्पष्ट करतो. याआधी जूनमध्येही सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने थेट प्रतिक्रिया दिली होती. “तुम्ही काहीही केलं तरी लोकांना जे म्हणायचं असतं, ते म्हणतातच. जर मी म्हटलं की मी पांढरे कपडे घातले आहेत, तर कोणीतरी उठून म्हणेल की नाही, तो काळा रंग आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आयुष्यात पुढे चालायचं असतं. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो”, असं ती म्हणाली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...