
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पतीसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. सोनालीने लॉकडाउनमध्ये दुबईतील एका मंदिरात कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. आता पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाहविधी पार पाडले. या लग्नानंतर सोनाली आणि कुणाल मेक्सिकोमध्ये फिरायला गेले आहेत.

मेक्सिकोच्या ट्रिपमधील फोटो आणि व्हिडीओ सोनाली तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतेय. 'तिसरं हनिमून' असं म्हणत तिने समुद्रकिनाऱ्यावरील हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

फॅशनेबल बिकिनीत सोनालीने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. सोनाली आणि कुणालला फिरायची प्रचंड आवड असल्याने लग्नानंतर दोघांनीही ही आवड जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

याआधी सोनाली कुणालसोबत मालदिव आणि दुबईला गेली होती. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

लंडनमध्ये सोनाली आणि कुणालने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 7 मे रोजी हा लग्नसोहळा पार पडला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ लवकरच सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचं सोनालीने सांगितलं.