‘त्या सईकडे मी कधीच जेवायला जाणार नाही’; त्या एका प्रसंगामुळे सोनाली कुलकर्णीने हातच जोडले
सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एका मुलाखतीत साई ताम्हणकरच्या घरी जेवणाच्या अनुभवाचा किस्सा सांगितला. या प्रसंगानंतर सोनाली सईकडे कधीच जेवायला जाणार नाही असा निर्णय घेतला. पण नक्की असं काय घडलं होतं?
बॉलिवूडमध्ये जशी मैत्री असते तशीच पार्टी, डिनर आणि कलाकारांमधील मैत्री ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही पाहायला मिळते. त्यांचे किस्सेही चर्चेत असतात. असाच एक किस्सा सांगितला आहे सोनाली कुलकर्णीने. मराठी मनोरंजनसृष्टीमधील आघीडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनाली कुलकर्णी आहे. तिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
सईकडे कधीच जेवायला न जाण्याची शपथ
याच निमित्ताने सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दल, खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल बोलताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीमध्ये आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल भाष्य केलं आहे. खाण्यासंदर्भात आपली कोणतीही नाटकं नसतात असं सोनालीने या मुलाखतीत सांगितलं. तसेच पुढे बोलताना तिने एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये नवऱ्याबरोबरच म्हणजेच कुणालबरोबर खाण्यासाठी बाहेर जाते तेव्हा पिझ्झा हा त्यांच्या ऑर्डरमध्ये असतो असं सांगितलं. यामागील कारण देताना तिने कुणाल आणि मी पहिल्यांदा पिझ्झा डेटवर भेटल्याने आम्ही बाहेर खायला जातो तेव्हा पिझ्झा ऑर्डर करतोच, असं सांगितलं. अचानक घरी पाहुणे आले तर आपण त्यांना वरण-भात करुन जेवायला घालू असंही सोनालीने या मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. वरण-भात लवकर होतो आणि तो एकदा कुकरला लावल्यानंतर पाहुण्यांबरोबर गप्पा मारायला वेळ मिळेल असं या उत्तरामागील लॉजिक सोनालीने सांगितलं.
मात्र या मुलाखतीत तिने अभिनेत्री सई ताम्हणकरकडे जेवायला गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे. पण त्या प्रसंगानंतर सईकडे कधीच जेवायला जाणार नाही अशी शपथच जणू सोनालीने घेतली आहे. असं नक्की तिच्यासोबत काय घडलं होतं?
“आम्ही दोघं पार मेलो होतो…’
पुढे तिला मुलाखतीत इंडस्ट्रीमधील अशा कोणत्या दोन व्यक्ती आहेत का की ज्यांच्याकडे तू कधीही जेवायला जाऊ शकते? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सोनालीने पाहिलं नाव नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरचं घेतलं. त्यानंतर दुसऱ्या नावाबद्दल विचार करत असताना सईचं नाव निघाल्यावर सोनालीने थेट कपाळावर हात मारला आणि वैतागून म्हणाली ‘या सईकडे तर आम्ही कधीच जेवायला जाणार नाही,’. पुढे सोनाली याचं कारणही सांगितलं, ती म्हणाली “तिने मला आणि कुणालला जेवायला बोलावलं होतं. तिने आम्हाला लंचला (दुपारच्या जेवणाला) बोलावलं होतं आणि डिनरला जेवायला वाढलं,” म्हणजेच दुपारच्या जेवणाला बोलावून रात्री सईने आम्हाला खाऊ घातलं असं सोनालीने सांगितलं. “आम्ही दोघं पार मेलो होतो. सई ताम्हणकरकडे कधी जेवायला जाणार नाही. तिचा पास्ता होतोचय, होतोचय असं झालेलं,” असंही सोनाली म्हणाली.
आम्ही ब्रेकफास्टही केला नव्हता
पुढे अजून एक किस्सा सांगत म्हणाली “आम्ही दुपारी लंचला जाणार होतो. सई म्हणाली होती, काही खाऊन-पिऊन येऊ नका हा, मी मस्त जेवण करणार आहे. भुकेने या, असं तिने सांगितलं होतं. म्हणून मी कुणालला फोन करुन म्हटलं होतं, ब्रेकफास्ट खाऊ नकोस हा, तर तू विचार करु शकते की ब्रेकफास्ट नाही खाल्लाय, लंच नाही खाल्लाय, डायरेक्टली डीनर! त्यामुळे नो,सई ताम्हणकर इज नो!” असं सोनाली अगदी वैतागून म्हणाली.