मी खोलीत कपडे बदलत होते, तिथं छुपा कॅमरा लावलेला अन्…सेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर प्रकार

Sonarika Bhadoria : प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदोरियानं एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला आहे.

| Updated on: Nov 09, 2026 | 3:11 PM
1 / 8
'देवों के देव महादेव' या मालिकेत माता पार्वतीची भूमिका साकारून अभिनेत्री सोनारिका भदोरियाला ओळख मिळाली. मात्र, सध्या ही अभिनेत्री आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

'देवों के देव महादेव' या मालिकेत माता पार्वतीची भूमिका साकारून अभिनेत्री सोनारिका भदोरियाला ओळख मिळाली. मात्र, सध्या ही अभिनेत्री आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

2 / 8

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत, या अभिनेत्रीनं कास्टिंग काउचबद्दल सांगितलंय. सोनारिका म्हणाली, 'असे दोन प्रसंग घडले आहेत, जेव्हा चॅनलच्या प्रमुखानं मला मेसेज करून हॉटेलमध्ये भेटायला सांगितलं, कारण माझे निर्माते मला पैसे देत नव्हते.'

3 / 8

'त्यानंतर, मी त्या चॅनलच्या प्रमुखाला ब्लॉक केलं. मी म्हणाले की, मला कोणतेही पैसे नको आहेत.' सोनारिका म्हणाली की, ती एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. तिच्यावर काहीही करण्यासाठी कोणीही जबरदस्ती केली नव्हती.

4 / 8

सोनारिका पुढे म्हणाली, ''महादेव' मालिकेनंतर, मी चित्रपटांमध्ये माझे नशीब आजमावत होते. मी वारंवार ऑडिशन्स देत होते. मॅनेजर्स अनेकदा माझी ओळख कास्टिंग डायरेक्टर्सशी करून देत असत.'

5 / 8

'एका प्रोडक्शन हाऊसच्या सीईओला खूप इंटरेस्ट होता. ते म्हणाले, 'येऊन मला भेट.' अशा दोन-तीन लोकांनी फक्त मेसेजमधूनच याबद्दल सांगितलं आहे. पण माझ्यासोबत तसं काही मोठं घडलं नाही.'

6 / 8

सोनारिकानं तिच्यासोबत घडलेला आणखी एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, 'महादेव'च्या आधी ती एका अशा शोमध्ये होती जो कधीच प्रसारित झाला नाही. सोनारिका म्हणाली की, त्या शोमध्ये व्हॅनिटी एरिया नव्हते; प्रत्येकाला खोल्या देण्यात आल्या होत्या. अभिनेत्रीने सांगितलं की, ती २४-२५ वर्षांची होईपर्यंत तिची आई तिच्यासोबत प्रत्येक सेटवर यायची.

7 / 8

सोनारिका म्हणाली, 'मी खोलीत कपडे बदलत होते, तेव्हा मला काहीतरी पडल्याचा आवाज आला. खोलीत लाकडाची एक वस्तू होती, ज्यात एक लहान छिद्र होते आणि तिच्या आत बॉक्ससारखी एक वस्तू ठेवली होती. जेव्हा माझ्या आईनं ते पाहिले, तेव्हा तिला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. तिनं सर्वांना बोलावलं आणि म्हणाली, 'काहीतरी बरोबर वाटत नाही.' ती म्हणाली, 'इथे काहीतरी आहे, बघ.' मग तिला आत एक फोन सापडला, आणि त्यावर सर्व काही रेकॉर्ड होत होते. सफाई करणारा मुलगा किंवा तिथला कोणीतरी मुलींच्या खोलीत फोन ठेवून जायचा, जेणेकरून जेव्हा त्या कपडे बदलायच्या, तेव्हा सर्व काही रेकॉर्ड व्हायचं.'

8 / 8

सोनारिका म्हणाली, 'जेव्हा मी त्या माणसाला शोधून तिथे आणलं, तेव्हा मी नंतर काहीतरी बोलले असते, पण मी त्याला खूप मारलं. मी त्याला इतकं मारलं की, माझ्या बांगड्या तुटल्या.'

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us