Ramayana : आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ने बुक माय शोवर रचला इतिहास; धुरंधर 2 आणि पुष्पा 2 लाही टाकलं मागे, एका तासात 1 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री
आदिनाथ कोठारेचा 'रामायण' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. रणबीर कपूर, साई पल्लवी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आदिनाथ कोठारेच्या या सिनेमाने इतिहास रचला आहे. इतिहास रचत त्याने 'पुष्पा 2'आणि 'धुरंधर 2'या सिनेमांना देखील मागे टाकले आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले असतानाच त्याने बुक माय शोवर असा विक्रम केला आहे. ज्यामुळे धुरंधर 2 आणि पुष्पा 2 सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरूवातीला ‘धुरंधर 2’ च्या तुलनेत या चित्रपटाची आगाऊ तिकिटविक्रि कमी होती. मात्र प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत गेला. विशेष म्हणजे, पहिल्या 4 दिवसांत बुक माय शोवर दररोज 10 लाखांहून अधिक तिकीटांची नोंद करणार ‘रामायण’ हा 6 वा भारतीय चित्रपट ठरला आहे.
आता 5 दिवशी म्हणजेच सोमवारी 9 नोव्हेंबरला या चित्रपटाने तिकिटविक्रिचा आणखी एक मोठा विक्रम केला. बुक माय शोच्या लाईव्ह ट्रॅकिंगनुसार, एका तासात ‘रामायणं’ ची तब्बल 1 लाख 11 हजार 830 तिकिटं बुक झाली. ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध असलेल्या प्रति तास तिकीटविक्रिच्या आकडेवारीनुसार हा आतापर्यंतचा आकडा असल्याचं वृत्त आहे.
याआधी हा विक्रम धुरंधर 2 च्या नावावर होता. या चित्रपटाची एका तासातील सर्वाधिक तिकिटविक्री 1 लाख 9 हजार 170 इतकी होती. तर ‘पुष्पा 2’ च्या नावावर 1 लाख 7 हजार 650 तिकिटांचा विक्रम होता. आता रामायण ने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.
या तीनही चित्रपटांचे विषय आणि मांडणी वेगवेगळी आहे. ‘पुष्पा 2’आणि ‘धुरंधर 2’ हे अॅक्शनपट आहे. तर ‘रामायण’ ही भारतीय घराघरांत असलेल्या पौराणिक कथेवर आधारित भव्य निर्मीती आहे. त्यामुळे या चित्रपटाला मिळणारा प्रतिसादही चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एका तासातील तिकिटविक्रिचा विक्रम ‘रामायण’ ने मोडला असला तरी बुक माय शोवरील ‘धुरंधर 2’ अजूनही पुढे आहे.
