AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत मोठी दुर्घटना! 10 वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटला, नंतर ज्याची भीती तेच घडलं

दिवाळीत मोठी दुर्घटना घडलीये. एका दहा वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आई रडून बेहाल झाली.

दिवाळीत मोठी दुर्घटना! 10 वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटला, नंतर ज्याची भीती तेच घडलं
diwali delhiImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 2:57 PM
Share

देशात सर्व ठिकाणी दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत दिवाळीत फटाके फोडून आनंद व्यक्त करत आहेत. लहान मुले देखील फराळ खाण्यासहित घराच्या परिसरात फटाके फोडून दिवाळी साजरी करत आहेत. या दिवाळीदरम्यान दिल्लीत मोठी दुर्घटना घडली. हातात फटाका फुटल्याने एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या नरेला परिसरात 8 नोव्हेंबर 2026 रोजी दहा वर्षांचा मुलगा फटाके फोडत होता. पाऊस फटाका फोडताना अचानक स्फोट झाला. या मुलाच्या छातीला गंभीर दुखापत झाली. हातात फटाका फुटल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूने आई रडून बेहाल झाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 9.45 वाजता घडली. मुलगा घराच्या बाहेर हातात पाऊस फटाका पेटवत होता. त्यावेळी अचानक फटाका हातात फुटला. यामुळे मुलाच्या छातीत गंभीर दुखापत झाली. पोलिसांना रात्री 10.50 वाजता रुग्णालयात मुलगा फटाक्यामुळे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते धावत रुग्णालयात पोहोचले. मृत्यूनंतर मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या आईने वेगळाच दावा केला आहे. मुलाची आई अंजली यांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. आईने म्हटलं की, माझा मुलगा फटाके फोडत होता. त्यावेळी एक दुसरा फटाका त्याच्या अंगावर येऊन फुटला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेत जखमी झाल्यानंतर रुग्णालायत नेले, त्यावेळी तो श्वास घेत होता. परंतु त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केले नाहीत. कुटुंबीयांना चुकीची वागणूक दिली. आता या प्रकरणात मृत मुलाच्या आईने न्यायाची  मागणी केली. तसेच मुलाला मिळालेल्या उपचारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर