AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनू निगमने महिनाभरात पुन्हा विकली कर्जतमधली जमीन; 10 लोकांनी मिळून 5 भागांमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी

गायक सोनू निगमने कर्जतमधली जमीन पुन्हा एकदा विकली आहे. महिनाभरापूर्वी त्याने तिथली आणखी एक जमीन विकली होती. आता एका महिन्याच्या आता त्याने वेगवेगळ्या लोकांना जमिनीचे भाग विकले आहेत. हा करार कितीला झाला, ते जाणून घ्या..

सोनू निगमने महिनाभरात पुन्हा विकली कर्जतमधली जमीन; 10 लोकांनी मिळून 5 भागांमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी
Sonu NigamImage Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 1:31 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने कर्जमधील आपली जमीन विकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमने पाच एकमेकांना लागून असलेले भूखंड विकले आहेत. तब्बल 95 लाख रुपयांना हा करार झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘CRE’ मॅट्रिक्सला मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, जवळपास महिनाभरापूर्वीच सोनूने याच भागातील एक जमीन 1.95 कोटी रुपयांना विकली होती. आता कर्जतच्या सावेले गावातील पाच लागून असलेल्या भूखंडांशी संबंधित त्याने हा व्यवहार केला आहे. या भूखंडांचं एकूण क्षेत्रफळ अंदाजे 1.067 हेक्टर आहे. या व्यवहाराची नोंदणी 12 मे 2026 रोजी करण्यात आली.

या व्यवहारात एकूण 5.7 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलं आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, चार लोकांनी मिळून 0.21 हेक्टरचा एक भूखंड 20 लाख रुपयांना खरेदी केला आहे. त्याच्या जवळच असलेला 0.215 हेक्टरचा दुसरा भूखंड दोन खरेदीदारांनी अंदाजे 20 लाख रुपयांना विकत घेतला आहे.

सोनू निगमने कर्जतच्या सावेले गावातील पाच भूखंड विकले

  • चार व्यक्तींच्या एका गटाने 20 लाख रुपयांना 0.21 हेक्टर जमीन खरेदी केली.
  • दोन खरेदीदारांनी मिळून जवळपासची 0.215 हेक्टर जमीन सुमारे 20 लाख रुपयांना खरेदी केली.
  • एका व्यक्तीने 20 लाख रुपयांना 0.225 हेक्टर जमीन खरेदी केली.
  • इतर दोन व्यक्तींनी 17 लाख रुपयांना 0.20 हेक्टर जमीन खरेदी केली.
  • 0.217 हेक्टरचा जमिनीचा भाग आणखी एका व्यक्तीने 18 लाख रुपयांना विकत घेतला.

काही दिवसांपूर्वीच एप्रिल महिन्यात सोनू निगमने रायगड जिल्ह्यातील कर्जत या डोंगराळ भागातील 1.9 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचं भूखंड 1.95 कोटी रुपयांना विकलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून सोनू सतत मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये मड आयलँड इथं 1197 चौरस मीटरची जमीन दहा कोटी रुपयांना खरेदी केली होती. तर गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोनू निगमने मुंबईतील सांताक्रूझ पूर्व इथली एक व्यावसायिक मालमत्ता पाच वर्षांसाठी 12.61 कोटींपेक्षा जास्त रुपयांनी भाडेतत्त्वावर घेतली होती.

सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सोनू निगमला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Follow Us
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली