मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, दात तुटला… चेहरा फोडला…, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? Video Viral

अभिनेत्री त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असातत. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्री मुंबईत तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, दात तुटला... चेहरा फोडला..., त्या रात्री नेमकं काय घडलं? Video Viral
अभिनेत्री प्रीत सिंग
| Updated on: Apr 28, 2026 | 8:16 AM

रिऍलिटी शो ‘स्प्लिट्सविला सीझन 16’ची स्पर्धक प्रीत सिंग सध्या चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे… अभिनेत्रीला एका व्यक्तीने गंभीररित्या जखमी केलं आहे… अभिनेत्रीचे दात टुटले असून चेहरा देखील जखमी आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना संताप देखील व्यक्त केला आहे.

प्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा खूप जखमी असून तिची प्रकृती गंभीर दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत प्रिती म्हणते, “एक सूचना. मी नेहमी ऐकलं होतं की मुंबई मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे, पण मला असा अनुभव येईल याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती. हे लिहित असतानाही माझे अंग थरथरत आहे. माझे डोळे सुजले आहेत, चेहऱ्यावर जखमा आहेत आणि माझ्यासोबत काय झाले हे मला अजूनही समजत नाही.”

प्रीत पुढे म्हणते, मी माझ्या मित्रासोबत एका क्लबमध्ये सहज बसली होती. अचानक एक मुलगी आत आली आणि आम्हाला आत येण्याची परवानगी कशी मिळाली, असं विचारत मोठ्याने ओरडू लागली. सुरुवातीला ते फक्त एक किरकोळ भांडण होतं, पण नंतर तिच्या एका पुरुष मित्राने हस्तक्षेप करून आमच्यावर हल्ला केल्यावर प्रकरण वाढलं.

 

‘त्याने मला इतक्या जोरात मारलं की, माझा एक दात तुटला. अन्य लोकं जोपर्यंत मदतीसाठी येत नाही, तोपर्यंत मारहाण सुरु होती… त्यांनतंर कळलं की, ती मुलगी स्वतःला इन्फ्लुएन्सर सांगत होती. मी अद्यापही धक्क्यात आहे की, एवढं सगळं असं कसं होऊ शकतं… खरंच कोणावरही अशी परिस्थिती यायला नको…’ असं देखील प्रीत म्हणाली.

व्हिडीओ समोर आल्यानंतर ‘स्प्लिट्सविला 16’ शोचा स्पर्धक जलक गोहिल याने देखील कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. ‘ती रात्र आमच्यासाठी एका वाईट स्वप्नासारखी होता… मला माहिती आहे प्रीतने काय सहन केलंय. याबद्दल बोलण्यासाठी देखील फार मोठ्या हिंमतीची गरज असते… माझी मनापासून इच्छा आहे की कोणालाही पुन्हा अशा परिस्थितीतून जावे लागू नये.”

रुथ ठाकूर याने पुढे लिहिलं, “हे खूप चुकीचे आणि त्रासदायक आहे. मला आशा आहे की तुम्ही ठीक असाल. तुम्ही काय सहन केले असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. कृपया स्वतःची काळजी घ्या, तुम्ही एक खूप कणखर स्त्री आहात.’

 

Follow Us