AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी-अनिल कपूरचं सर्वात रोमँटिक गाणं, आजही अनेकांचं आवडतं, ऐकू येताच चाहते..

39 वर्षांपूर्वीचं श्रीदेवी-अनिल कपूर यांचं सर्वात रोमँटिक गाणं. किशोर कुमार यांनी 20 वर्षाच्या गायकासोबत रचला होता इतिहास. आजही अनेकांच्या मोबाईलमध्ये हे गाणं ऐकायला मिळतं.

श्रीदेवी-अनिल कपूरचं सर्वात रोमँटिक गाणं, आजही अनेकांचं आवडतं, ऐकू येताच चाहते..
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 20, 2026 | 1:41 PM
Share

सोशल मीडिया आणि रिमिक्सच्या युगापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी आपल्या सुरांनी आणि आठवणींनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘काटे नहीं कटते’ हे त्यापैकीच एक अजरामर गाणे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा ज्येष्ठ गायिका अलीशा चिनॉय यांचा अनुभव विशेष चर्चेत आला आहे. गायक किशोर कुमार यांच्यासोबत गाण्याची संधी मिळणे, ही त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची आठवण ठरली.

बोनी कपूर निर्मित आणि शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते’ हे गाणे श्रीदेवी यांच्या मोहक अभिनयामुळे आणि किशोर कुमार व अलीशा चिनॉय यांच्या सुरेल आवाजामुळे विशेष लोकप्रिय झाले.

अलीशा चिनॉय यांच्या आठवणीनुसार, बप्पी लाहिरी यांच्यासोबत हिट गाणे दिल्यानंतर त्यांना शेखर कपूर यांच्या कार्यालयातून फोन आला. गाण्यासाठी स्टुडिओत पोहोचल्यानंतर त्यांना हे किशोर कुमार यांच्यासोबतचे युगलगीत असल्याचे समजले. त्या वेळी तरुण असलेल्या अलीशा यांना एवढ्या मोठ्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्याने आनंदासोबतच प्रचंड दडपणही आले होते.

किशोरदांची मस्ती आणि अलीशा यांचा अनुभव

रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये किशोर कुमार नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये होते. लक्ष्मीकांत यांनी अलीशा यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. मात्र, किशोरदांनी फारसे बोलणे न करता आपले काम सुरू ठेवले. अलीशा यांनी गंमतीने आठवण सांगितली की, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून जणू ते ‘ही काय गाणार?’ असा विचार करत असावेत, असे त्यांना वाटले.

किशोर कुमार रेकॉर्डिंगपूर्वी विनोद करत होते आणि सहजपणे वावरत होते, तर अलीशा मात्र गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोघांमध्ये फारसा संवाद झाला नाही; मात्र स्टुडिओतील वातावरण आणि संगीताची ऊर्जा त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली.

‘काटे नहीं कटते’ ठरले अजरामर

या रेकॉर्डिंगनंतर किशोर कुमार स्टुडिओतून निघून गेले. त्यांच्यासोबत फारशी ओळख किंवा संवाद झाला नसला, तरी त्यांच्या आवाजासोबत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद अलीशा यांच्या मनात कायम राहिला.

श्रीदेवी यांची मनमोहक अदाकारी, अनिल कपूर यांची उपस्थिती आणि किशोर कुमार-अलीशा चिनॉय यांची सुरेल जुगलबंदी यामुळे ‘काटे नहीं कटते’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय क्लासिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

Follow Us
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ