विराटची निवृत्ती ही मोठी हानी, पण राहुल त्याच्या बॅटने उत्तर देईल; सुनील शेट्टीने केलं जावयाचं कौतुक

दुबईतील News9 ग्लोबल समिटमध्ये सुनील शेट्टी यांनी केएल राहुल आणि विराट कोहली यांच्याबद्दल आपले विचार मांडले. त्याने राहुलच्या देशभक्तीचे कौतुक केलं. तर कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल दुःख व्यक्त केले. फिटनेसवर बोलताना त्याने कोहलीला आदर्श म्हटलं.

विराटची निवृत्ती ही मोठी हानी, पण राहुल त्याच्या बॅटने उत्तर देईल; सुनील शेट्टीने केलं जावयाचं कौतुक
Sunil Shetty at News9 Global Summit, Praises KL Rahul, Laments Kohli Retirement
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Jun 20, 2025 | 3:05 PM

दुबईमध्ये न्यूज९ ग्लोबल समिट 2025 ला भव्य पद्धतीने सुरुवात झाली आहे. या तीन दिवसांच्या ग्लोबल समिटच्या पहिल्या दिवशी, गुरुवार, 19 जून रोजी, देश आणि जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या. बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी देखील कार्यक्रमाला उपस्थित होता. अभिनयाव्यतिरिक्त सुनील शेट्टी क्रिकेटप्रेमी देखील आहे. जेव्हा त्याला क्रिकेट आणि अर्थात टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि जावयाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सुनील शेट्टीने जावयाचं कौतुक केलं. तसेच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दलही आपलं मत व्यक्त केलं.

फिटनेसचा उल्लेख होताच, सुनील शेट्टीने दिले विराट कोहलीचे उदाहरण

20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी, सुनील शेट्टी यांनी दुबईमध्ये भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गजांबद्दल आपले विचार मांडले. या विशेष चर्चेदरम्यान, टीव्ही 9 ग्रुपचे सीआयओ आणि एमडी बरुण दास यांनी क्रिकेट आणि फिटनेस सारख्या विषयांचा उल्लेख केला, जे सुनील शेट्टीच्या फार जवळचे आहेत. फिटनेसचा उल्लेख होताच, सुनील शेट्टीने  विराट कोहलीचे उदाहरण दिले.

कोहलीच्या निवृत्तीमुळे सुनिल शेट्टी देखील दुःखी

सुनील शेट्टी म्हणाला, “विराट कोहली हा तंदुरुस्त खेळाडूचे सर्वात मोठे उदाहरण आहे, तो एका अनफिट मुलापासून सर्वात तंदुरुस्त आणि सुपर ह्युमन कसा बनला हे खरंच कौतुकास्पद आहे. या तंदुरुस्तीमुळे तो 35-36 वर्षांच्या वयातही सतत खेळत आहे.” तथापि, प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याप्रमाणे, सुनील शेट्टीनेही विराटच्या कसोटीतून अचानक निवृत्तीबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “विराट कोहली खेळत नाही हे कसोटी क्रिकेटचे सर्वात मोठे नुकसान आहे.”

राहुलसाठी देशच सर्वकाही आहे.

जेव्हा केएल राहुलचा प्रश्न आला तेव्हा सुनील शेट्टीने स्पष्टपणे सांगितले की “तो माझा मुलगा आहे आणि जगाने राहुलबद्दल बोलण्यापेक्षा त्याचे कौतुक करणे चांगले होईल” तसेच त्याने देशासाठी खेळण्याच्या राहुलच्या आवडीचा उल्लेख केला आणि संघाच्या गरजा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. सुनील शेट्टी म्हणाला, “जेव्हा तो देशासाठी खेळतो तेव्हा तो त्याच्या सर्व उत्कटतेने खेळतो. त्याला वाटते की देश त्याच्यासाठी सर्वकाही आहे. जेव्हा पण मी त्याला विचारतो की त्याला कोणत्या पदावर खेळायचे आहे. तेव्हा तो नेहमी म्हणतो की हे सर्व माझ्या देशासाठी आहे, जेव्हा माझ्या छातीवर देशाचा ध्वज असतो तेव्हा मला त्याचा अभिमान वाटतो.”