AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govina : एकीकडे गोविंदा फिरतोय कोमलसोबत, तर दुसरीकडे बायकोच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Govina : गोविंदा आणि कोमल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना, अभिनेत्याच्या बायकोने खळबळ उडवणारं वक्तव्य केलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Govina : एकीकडे गोविंदा फिरतोय कोमलसोबत, तर दुसरीकडे बायकोच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अभिनेता गोविंदा
| Updated on: Sep 24, 2026 | 12:33 PM
Share

Govina : अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, गोविंदाच्या घटस्फोच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. पण गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दोघे माध्यमांसमोर आले आणि सर्व चर्चांणा पूर्णविराम दिलेला. पण त्या दिवसानंतर सुनीता हिने अनेक ठिकाणी गोविंदावर गंभीर आरोप केले. त्यानंतर गोविंदा अनेकदा कथित गर्लफ्रेंड आणि को – स्टार कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत दिसल. सर्वात आधी दोघांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील गोविंदा आणि कोमल यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी दुजारा मिळाला.

नुकतच सुनीता हिने भिनेत्याविरुद्धचा घटस्फोटाचा अर्जही मागे घेतला होता; राखी सावंत हिच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात, गोविंदाच्या पत्नीने सांगितलं की, गोविंदा यांचं दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्याचं नियोजन होतं. या सर्व पार्श्वभूमीवर, गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा हिने नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याचं वर्णन “अतिशय चांगला” आणि “अत्यंत प्रामाणिक” व्यक्ती असं केलं आणि त्या अभिनेत्याशी लग्न केल्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, याचा पुनरुच्चार केला.

एका मुलाखतीत गोविंदाच्या पत्नीने सांगितलं, ‘गोविंदा याच्यासोबत लग्न केल्याचा मला कोणताच पश्चाताप नाही. जेव्हा मी गोविंदा याला भेटली, तेव्हा तो एक चांगला माणूस होता, खूप प्रामाणिक होता. लोकांना असं वाटतं की, मी खूप कठोर आहे. पण मी जे काही बोलते, ते खऱ्या मनाने बोलते… फार कमी लोकं मला समजून घेतात, त्याच्यासोबत लग्न केल्याचा मला कोणताच पश्चाताप नाही. लोकांनी स्वतःचं आयुष्य जगलं पाहिजे आणि दुसऱ्यांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे. आता मी स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.’

सांगायचं झालं तर, सुनीता आणि गोविंदा यांच्या लग्नातील अडचणींविषयी बऱ्याच काळापासून अंदाज वर्तवले जात आहेत. ही चर्चा तेव्हा आणखी वाढली, गोविंदा कदाचित कोमल रानीला डेट करत आहे, जी त्याच्या आगामी सिनेमामधील को-स्टार आहे. मुंबई विमानतळावर दोघे एकत्र दिसल्यामुळे या अफवांना आणखी उधाण आलं, ज्यामुळे दोघांमधील संभाव्य नात्याबाबत लोकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली. मागच्या दिवसांत गोविंदा कोमलसोबतच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही पोहोचला होता.

नंतर सुनीता यांनी गोविंदा आणि कोमलविषयी पसरणाऱ्या अफवांवर भाष्य केलं होतं. कोमलसोबत गोविंदाला पाहिल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सुनीता पापाराझींना म्हटलं होतं, “विनाश काले विपरीत बुद्धि,” ज्यावरून या प्रकरणावर तिचा राग दिसून आला होता. दरम्यान, यावर उत्तर म्हणून गोविंदाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सुनीताला प्रत्युत्तर दिलं होतं आणि कौटुंबिक वाद मीडियापासून दूर ठेवण्याचं आवाहन देखील केलं होतं.

Follow Us
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला