
Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapoor Death: अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याने वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने संजय याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. संजय याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. संजय याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर करिश्माच्या चाहत्यांमध्ये वाद सुरु आहे. सोशल मीडियावर कमेंट करत करिश्माचे चाहते संजय याच्या निधनावर व्यक्त होताना दिसत आहेत.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंवर आता नेटकरी कमेंट करत संजयच्या निधनावर प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘आज पुन्हा समोर आलं आहे की, जर तुम्ही कोणाला काहीच बोलत नसाल, बदला घेत नसाल, तर कुठेतरी विश्व सूड घेते. आज मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे.’
दुसऱ्या नेटकरी कमेंट करत म्हणतोय, ‘तुझ्या पतीच्या निधनाती बातमी ऐकून मी प्रचंड दुःखी आहे.’ या कमेंटवर निशाणा साधत आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ती कदाचित आनंदी असेल…’, ‘तिच्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे…’ असं देखील एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
यावर नेटकरी म्हणाला, ‘लग्नानंतर करिश्माने अनेक अडचणींचा सामना केला आहे. नातं टिकवण्यासाठी तिने तडजोड केली आहे. पण तरी देखील तिचं नातं फार काळ टिकलं नाही. नियतीने तिला दगा दिला पण ती खंबीर राहिली.’ असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.
संजय याच्या निधनानंतर कमेंट करत प्रतिक्रिया देणाऱ्यांना अन्य एका नेटकऱ्यांने चांगलंच सुनावलं आहे. ‘असं का लिहित आहात? संजय तिच्या मुलांचा बाप होता. संजय चांगल पती होऊ शकला नाही, पण तो एक चांगला बाप नक्कीच होती. मुलांनी त्यांच्या वडिलांना गमावलं आहे. तो परफेक्ट नव्हता, पण एखाद्याचा मृत्यू हा कधीही आनंद साजरा करण्याचं कारण नसतो.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीनाच्या पूर्व पतीच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
संजय कपूर याने अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर मुलाच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये करिश्मा – करीना विभक्त झाले आणि 2016 मध्ये त्यांनी घेटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.