करिश्मा कपूरच्या पूर्व पतीचं निधन, घरातून अशा अवस्थेत बाहेर पडली करीना, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapur: करिश्मा कपूरच्या पूर्वी पतीच्या निधनानंतर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, करिश्माला भेटायला गेलेली करीना अशा अवस्थेत पडली घराबाहेर, व्हिडीओ तुफान व्हायरल

Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapur: अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याने वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय कपूर याच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या संजय याचा मृतदेह परदेशात असल्यामुळे भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, संजय कपूर याच्या निधनाची बातमी कळताच अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान दोघे करिश्माच्या घरी पोहोचले.
सध्या करीना आणि सैफ अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये करीना भावूक झाल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करीना रडताना दिसत आहे. व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
सांगायचं झालं तर, संजय याच्या निधनाची माहिती मिळताच बहिणीला भेटण्यासाठी करीना, करिश्माच्या घरी पोहोचली. पण घरातून बाहेर पडल्यानंतर करीना भावूक झाल्याचं दिसून आलं. अभिनेत्री अश्रू लपवताना दिसली. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मुलाच्या जन्मानंतर संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी डेट केल्यानंतर करिश्मा हिने टॉप उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. 2003 मध्ये मुंबईत दोघांनी लग्न केलं. लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मुलाच्या जन्मानंतर करिश्मा आणि संजय विभक्त झाले. करिश्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर याने 2017 मध्ये प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केलं. संजय आणि प्रिया यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर संजय याने नवा संसार थाटला. पण करिश्मा हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
मुलांसाठी करिश्मा – संजय यांचा निर्णय
करिश्मा कपूरने संजय कपूरला घटस्फोट दिला, पण त्यांच्या मुलांमुळे ते अनेकदा भेटत होते. दोन्ही मुलांसोबत संजय याचं चांगलं नाचतं होतं. मुलांचे वाढदिवस देखील दोघे एकत्र साजरा करायचे. शिवाय घटस्फोटानंतर देखील, दोघे आई – वडिलांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडयचे.