AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काम करताना मरण आलं पाहिजे, मज्जा येईल कारण…, स्वतःच्याच मृत्यूबद्दल असं काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?

वयाच्या 78 व्या वर्षी एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, स्वतःच्याच मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य करत झाल्या भावूक, म्हणाल्या, 'काम करताना मरण आलं पाहिजे, मज्जा येईल कारण...', सर्वत्र उषा नाडकर्णी यांची चर्चा

काम करताना मरण आलं पाहिजे, मज्जा येईल कारण..., स्वतःच्याच मृत्यूबद्दल असं काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?
फाईल फोटो
| Updated on: Jun 07, 2025 | 11:19 AM
Share

Usha Nadkarni : मराठी सिनेविश्वातीस प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत उषा नाडकर्णी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तर उषा नाडकर्णी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. उषा नाडकर्णी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

काम करताना मृत्यू आला पाहिजे. आपल्यामुळे उगाचच कोणाला त्रास कशाला? असं म्हणत उषा नाडकर्णी भावूक देखील झाल्या. मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘माझं असं म्हणणं आहे की, काम करताना मरण आलं पाहिजे. मज्जा येईल मला… आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको. म्हणजे आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको आणि लोक आपल्यासाठी करतात हे पाहून मला वाईट वाटायला नको.

उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, ‘मी आजारी पडली तर, माझ्या मुलाला त्रास होणार. तो त्याच्या बायको, मुलील बघणार की मला बघणार…? माझ्या बाजूच्या आहेत बंगाली त्यांनी मला सांगितलं आहे. आंटी कभी भी कुछ हो गया शरमानेका नही… बीच रात को भी फोन करो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केलेल्या भावनांची चर्चा रंगली आहे.

उषा नाडकर्णी एकट्याच राहतात. ‘मी एकटी राहते आणि एकटं राहण्याची मला आता सवय झाली आहे. सुरुवातीला कठीण वाटलं पण आता एकटं राहायला पण आवडत आहे…’ असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या. उषा नाडकर्णी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

सांगायचं झालं तर, उषा नाडकर्णी कायम त्यांच्या आयुष्यातील खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतात. पण अभिनय विश्वातील त्यांचा प्रवास फार काही सोपा नव्हता. करीयरच्या सुरुवाती त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. वडिलांनी अभिनेत्रीला मारहाण केली तर, आईने घराबाहेर काढलं. पण उषा नाडकर्णी स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आणि अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलं.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.